काचिगुडा-नरखेड एक्स्प्रेसला थांबा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:13 AM2021-09-03T04:13:35+5:302021-09-03T04:13:35+5:30
पुसला : लॉकडाऊन काळात रद्द करण्यात आलेल्या काचिगुडा-नरखेड एक्स्प्रेस रेल्वे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू करण्यात आली आहे. परंतु, त्यावेळी ...
पुसला : लॉकडाऊन काळात रद्द करण्यात आलेल्या काचिगुडा-नरखेड एक्स्प्रेस रेल्वे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू करण्यात आली आहे. परंतु, त्यावेळी बंद करण्यात आलेला पुसला येथील थांबा सुरू झालेला नाही. त्यामुळे काचिगुडा एक्सप्रेस पुसला येथे थांबा देण्याची मागणी नागरीकांनी केली आहे. लॉकडाऊन काळात बंद असलेली काचिगुडा एक्स्प्रेस सुरू झाली.
पुसला गावाला लागून असलेल्या लिंगा, करवार, जामगाव, पंढरी, महेंद्री, जामठी, लोहद्रा, एकलविहीर, सावंगी, गणेशपूर, खराड येथून प्रवाशांना पुसला रेल्वे स्थानक जवळचे असल्यामुळे त्यांना प्रवास करणे सोईचे होते. परंतु, काचिगुडा एक्स्प्रेसचा थांबा रद्द केल्यामुळे आता प्रवाशांना वरूडला जावे लागत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक फटका सोसावा लागत आहे. त्यामुळे काचिगुडा एक्स्प्रेसचा थांबा पुन्हा सुरळीत सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. काचिकुडा एक्सप्रेसला थांबा देण्याकरीता ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने खा. रामदास तडस यांना पाठपुरावा करण्याची मागणी करीत तसे निवेदन पुसल्याचे सरपंच धनराज बमनोटे यांनी दिले आहे.