चांदूर बाजार येथे प्लास्टिकबंदीला खो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 10:06 PM2018-09-13T22:06:17+5:302018-09-13T22:07:12+5:30

दिवसेंदिवस सगळीकडे वाढलेल्या प्रदूषणाला मुख्य कारण असलेले प्लास्टिक पन्नी व थर्मकोल यांच्यावर शासनाने नुकतीच बंदी आणली. मात्र, शासनाचा धाक नसलेले नागरिक मुख्य रस्त्यावरील दुभाजकापुढे वापरलेल्या प्लास्टिक पन्नीचे ढीग लावत आहेत.

Stop the plastic bands at Chandur Bazar! | चांदूर बाजार येथे प्लास्टिकबंदीला खो!

चांदूर बाजार येथे प्लास्टिकबंदीला खो!

Next
ठळक मुद्देचौकात ढीग; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

चांदूर बाजार : दिवसेंदिवस सगळीकडे वाढलेल्या प्रदूषणाला मुख्य कारण असलेले प्लास्टिक पन्नी व थर्मकोल यांच्यावर शासनाने नुकतीच बंदी आणली. मात्र, शासनाचा धाक नसलेले नागरिक मुख्य रस्त्यावरील दुभाजकापुढे वापरलेल्या प्लास्टिक पन्नीचे ढीग लावत आहेत. पालिका प्रशासनातर्फे प्लास्टिकबंदीला ‘खो’ दिला असल्याचे चित्र निर्माण झाले.
शहरातील काही मोठ्या दुकानदारांनी गल्लीबोळातील किरकोळ दुकानदारांकडे आपला माल साठवून ठेवला असून, वेळोवेळी गरज भासल्यास या दुकानदारांकडून माल अर्थात प्लास्टिकच्या बंदी असलेल्या वस्तू आणून विक्री करण्यात येते. पालिकेतील काही नगरसेवकांच्या मध्यस्थीमुळे संबंधित विभागातर्फे करण्यात आलेल्या कार्यवाहीला सूट देण्यात आली होती. नेमके याच दुकानदाराने मंगळवारी सकाळी गांधी चौक परिसरातील मुख्य रस्त्याच्या दुभाजकच्या आत प्लास्टिक पणीचे ढिगारे लावले आहे. यामुळे आरोग्य विभागातर्फे शहरात करण्यात आलेले कार्यवाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. येत्या काही दिवसांत पालिका प्रशासनातर्फे शहरात स्वच्छतेच्या नावावर दीड कोटी रुपये खर्च करून कंत्राटी पद्धतीने सफाई केली जाणार आहे. मात्र, शासनाने हा निधी शहरातील प्लास्टिक पूर्ण नष्ट झाल्यावरच उपलब्ध करण्याची अट घातल्यास पालिका प्रशासन नाइलाजास्तव कार्यवाही करणार, हे मात्र निश्चित.

Web Title: Stop the plastic bands at Chandur Bazar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.