सातबारा कोरा करण्यासाठी रास्ता रोको

By admin | Published: April 15, 2017 12:12 AM2017-04-15T00:12:57+5:302017-04-15T00:12:57+5:30

शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांचे प्रमाण वाढत आहे. शेतकऱ्यांंच्या मालाला भाव नाही.

Stop the road to dry | सातबारा कोरा करण्यासाठी रास्ता रोको

सातबारा कोरा करण्यासाठी रास्ता रोको

Next

कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन : वाहने रोखली, वाहतूक विस्कळीत, कार्यकर्त्यांना अटक व सुटका
वरुड : शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांचे प्रमाण वाढत आहे. शेतकऱ्यांंच्या मालाला भाव नाही. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचा आरोप करीत शुक्रवारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलक कार्यकर्त्यांनी दुपारी १ च्या सुमारास वाहने रोखून धरली. यामुळे सुमारे १ तास शहरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या.
केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. मात्र, त्यांना शेतकरी हिताची चिंता नाही. कर्जमुक्ती होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. मात्र शासनाने हा निर्णय घेतला नाही. याचा विरोध करण्यासाठी वरूड तालुका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यात ग्रामीण भागातील शेकडो शेतकरी, शेतमजूर सहभागी झाले होते. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी भाजप सरकार विरोधात निषेध व्यक्त केला. जोपर्यंत शेतकऱ्याचा सातबारा कोरा होणार नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार असल्याचा इशारा देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरूड तालुका अध्यक्ष बाळू पाटील, वर्धा लोेकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व पं.स. सभापती विक्रम ठाकरे, माजी जि.प. अध्यक्ष ज्ञानेश्वर दाभाडे, वरूड तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष अजय नागमोते, जि.प. समाजकल्याण सभापती सुशिला कुकडे, राजू बहुरूपी, चंद्रशेखर अळसपुरे, राजेंद्र पाटील, विष्णुपंत निकम, राजू पापडकर, सिंधू कर्नाके, दुर्गा हरणे, पांडुरंग निकम, अनिल गुल्हाने, अजय पांडव, रोषण देशमुख, नीलेश मगर्दे, रोशन दारोकर, धनंजय बोकडे, विलास उघडे, दीपक देशमुख, अनिल कडू, किशोर गोमकाळे, सुभाष शेळके, अरूण ताथोडे, रामभाऊ शेळके, पुरूषोत्तम अनासाने उपस्थित होते. यावेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केली व नंतर सोडले. (ताुलका प्रतिनीधी)

Web Title: Stop the road to dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.