नांदगावातील बालविवाह रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:10 AM2021-05-28T04:10:42+5:302021-05-28T04:10:42+5:30
याबाबत येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी वीरेंद्र गलफट यांना वाशिम येथून माहिती प्राप्त झाली. त्यांनी गट विकास अधिकारी ...
याबाबत येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी वीरेंद्र गलफट यांना वाशिम येथून माहिती प्राप्त झाली. त्यांनी गट विकास अधिकारी विनोद खेडकर यांचे सूचनेने पोलीस निरीक्षकांकडे रीतसर तक्रार केली. त्यानुसार महिला बालविकासचे कर्मचारी चव्हाण, अंगणवाडी सेविका लेकुरवाळे व पोलीस शिपाई मेश्राम यांनी ओंकारखेडा परिसरातील संबंधित घरी जाऊन मुलीच्या आईवडिलांना संपूर्ण घटनाक्रम विचारला. सदर मुलगी अल्पवयीन असल्याने नियोजित विवाह रद्द करण्यात यावा, असे समुपदेशन बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी फोनवरून केले. त्यांनतर पोलिसांकडून लेखी समज देण्यात आली. गलफट यांनी उंबर्डा बाजार पोलीस ठाण्यातसुद्धा सदर प्रकरणाची माहिती देऊन मुलाच्या पालकांना समज देण्यात यावी, अशी विनंती केली.