‘पीएचसी’सह सर्व शासकीय दवाखान्यांत औषधसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:17 AM2021-09-07T04:17:12+5:302021-09-07T04:17:12+5:30

अमरावती : गत काही दिवसांपासून पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच भागात कीटकजन्य आजाराचा प्रादुर्भाव दिसून आला असून, त्यात प्रामुख्याने डेंग्यू या ...

Storage of medicines in all government hospitals including PHC | ‘पीएचसी’सह सर्व शासकीय दवाखान्यांत औषधसाठा

‘पीएचसी’सह सर्व शासकीय दवाखान्यांत औषधसाठा

Next

अमरावती : गत काही दिवसांपासून पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच भागात कीटकजन्य आजाराचा प्रादुर्भाव दिसून आला असून, त्यात प्रामुख्याने डेंग्यू या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. सर्व कीटकजन्य आजाराच्या निर्मूलनासाठी फवारणी, सर्वेक्षण सर्वदूर करण्यात येत असून, आवश्यक उपचार व औषधसाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांसह सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शरद जोगी यांनी दिली.

डॉ. जोगी म्हणाले की, कीटकजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांच्याद्वारे ग्रामीण व शहरी भागात आरोग्य केंद्रनिहाय, वॉर्डनिहाय सर्वेक्षण होत आहे. अमरावती महापालिकेच्या क्षेत्रातील बांधकामावरील मजुरांची नोंद करून बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी डास अळी आढळल्यास टॅमिफॉस कार्यवाही करण्यात येत आहे. ठिकठिकाणी डासोत्पत्ती स्थानात गप्पी मासे सोडण्याची कार्यवाहीही सुरू आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांकडून घरातील पाणीसाठे तपासणी करून डास अळी आढळल्यास समक्ष भांडी रिकामी करणे, डासअळी घनतेत वाढ झाली असल्यास त्वरित जलद ताप सर्वेक्षण, साठवलेल्या पाणीसाठ्यात टॅमिफॉस द्रावण टाकणे, साठविलेले पाणीसाठे आठवड्यातून किमान एक वेळा रिकामे करणे, कीटकनाशक पायरेथ्रम दोन टक्के औषधांची फवारणी करणे, विशेषत: डेंग्यू प्रादुर्भाव आढळलेल्या गावात आठवड्यातून दोन वेळा धूर फवारणी करण्यात येत आहे, असेही डॉ. जोगी म्हणाले.

/////////////

जिल्ह्यात ऑगस्ट २०२१ पर्यंत १ हजार ६७० संशयित डेंग्यू रुग्णांचे रक्तजल नमुने तपासले. तपासणीअंती निश्चित रुग्णसंख्या २०१ आढळली. कीटकजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी आवश्यक उपचार व औषधे जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आदी सर्व ठिकाणी उपलब्ध आहेत.

- डॉ. शरद जोगी, जिल्हा हिवताप अधिकारी

////////////////

बॉक्स

हे कटाक्षाने पाळा

- आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवणे

- घरालगत नाली असल्यास पाणी साचू नये, ते वाहते ठेवणे

- वापरात नसलेली भांडी रिकामी करणे

- झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे

- ताप आल्यास त्वरित दवाखान्यात जाऊन तपासणी व उपचार घेणे

- आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे

Web Title: Storage of medicines in all government hospitals including PHC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.