वादळाचा फटका, काही भागांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:11 AM2021-05-17T04:11:20+5:302021-05-17T04:11:20+5:30

फोटो पी १६ वादळ अमरावती : रविवारी दुपारी अचानक आलेल्या वादळाचा फटका महावितरणला बसला असून, यात महावितरण यंत्रणा ...

Storm blows, power outages in some parts | वादळाचा फटका, काही भागांचा वीजपुरवठा खंडित

वादळाचा फटका, काही भागांचा वीजपुरवठा खंडित

Next

फोटो पी १६ वादळ

अमरावती : रविवारी दुपारी अचानक आलेल्या वादळाचा फटका महावितरणला बसला असून, यात महावितरण यंत्रणा विस्कळीत होऊन काही भागांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. महावितरण यंत्रणा लागलीच कामाला लागल्याने टप्या-टप्प्याने खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे.

२२० केव्ही कोंडेश्वर या पारेषणच्या अती उच्चदाब उपकेंद्रातून अमरावती शहराला वीजपुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही वडाळी आणि ३३ केव्ही विद्युतनगर या वाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. परंतु महावितरणच्या तत्पर प्रयत्नाने ३३ केव्ही वडाळी व ३३ केव्ही विद्युतनगर या वाहिनीचा वीजपुरवठा अर्ध्या तासातच पूर्ववत करण्यात आला.

त्याचबरोबर ११ केव्ही राजकमल, ११ केव्ही एल.आय.सी.११ केव्ही श्रीकृष्ण पेठ आणि ११ केव्ही मोरबाग या ३३ केव्ही पॉवर हाऊस या उपकेंद्रातून निघणाऱ्या वाहिन्यांचाही वीजपुरवठा बाधित झाला आहे. याशिवाय २२० केव्ही अमरावती या उच्चदाब उपकेंद्रातून निघणाऱ्या ११ केव्ही वडाली,११ केव्ही बडनेरा, ११ केव्ही टाऊन ३ आणि ११ केव्ही लक्षमीनगर या वीज वाहिन्यांचाही वीजपुरवठा खंडित झाला आहे.

वादळाची तीव्रता प्रचंड असल्याने रामपुरी कॅम्प येथे रोहित्र कोसळले. याशिवाय झाडही वीज वाहिनीवर उन्मळून पडले. पलास लाईन गाडगेनगर येथेही वीज वाहिनीवर झाड पडून वीज वाहिनी तुटली. अशाचप्रकारे इतर ठिकाणीही नुकसानाची शक्यता नाकारता येत नाही. महावितरण यंत्रणा युध्दस्तरावर कामाला लागली आहे. अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे, कार्यकारी अभियंता आनंद काटकर या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत. वीजपुरवठा सुरळीत करायला थोडा वेळ लागला तरी टप्प्यप्प्प्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.

Web Title: Storm blows, power outages in some parts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.