वादळाचा शहराला तडाखा, झाडांखाली दबल्या कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 05:00 AM2021-05-17T05:00:00+5:302021-05-17T05:00:52+5:30

शहरात दुपारी १.१० पासून सुमारे २० मिनिटे वादळासह मान्सूनपूर्व पावसाने शहरात अनेक ठिकाणी नुकसान झाले. कॅम्प परिसरात झाड पडल्याने त्याखाली कार दबली. राधानगरातदेखील झाड पडल्याने कार दबल्याचे घटना घडली. सुदैवाने यात जीवितहानी टळली. याशिवाय पीडीएमएमसी मार्गावर फांद्या पडल्याने विद्युत तारा तुटल्या. रामपुरी कॅम्प भागात हीच स्थिती दिसून आली.

The storm hit the city, cars crushed under the trees | वादळाचा शहराला तडाखा, झाडांखाली दबल्या कार

वादळाचा शहराला तडाखा, झाडांखाली दबल्या कार

Next
ठळक मुद्देफांद्या तुटल्या, वीजवाहिन्या विस्कळीत, अर्ध्याअधिक शहराची वीज गूल, पाच दुचाकींचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तौक्ते वादळामुळे झालेल्या हवामानशास्त्रीय बदलाने रविवारी दुपारी मान्सूनपूर्व वादळासह पावसाने शहराला चांगलाच तडाखा दिला. अनेक भागांतील वृक्ष उन्मळून पडले. त्याखाली कार दबली, काही भागातील टिनपत्रे उडाली, जाहिरातीची फलके पडली. झाडांच्या फांद्यांमुळे विद्युत तारा तुटल्या. अर्ध्याअधिक शहराचा वीजपुरवठा खंडित झाला. जिल्ह्याच्या ग्रामीण भागालादेखील या वादळाने तडाखा दिला. 
 शहरात दुपारी १.१० पासून सुमारे २० मिनिटे वादळासह मान्सूनपूर्व पावसाने शहरात अनेक ठिकाणी नुकसान झाले. कॅम्प परिसरात झाड पडल्याने त्याखाली कार दबली. राधानगरातदेखील झाड पडल्याने कार दबल्याचे घटना घडली. सुदैवाने यात जीवितहानी टळली. याशिवाय पीडीएमएमसी मार्गावर फांद्या पडल्याने विद्युत तारा तुटल्या. रामपुरी कॅम्प भागात हीच स्थिती दिसून आली. याशिवाय सायन्सकोर शाळेवर छपराची टिनपत्रे उडाली. विभागीय क्रीडा संकुलातील झाडांच्या फांद्या तुटल्या अन् शेडचे टिन वाकले. अनेक भागात झाडांखाली फळांचा खच लागला होता. 
बडनेरा शहरातही वादळी वाऱ्याचा फटका बसला. रेल्वे पुलावरील जाहिरातीचे फलक कोसळून खाली पडले. सीमेंट रस्तेनिर्मितीच्या कामांना तूर्त ब्रेक लागला आहे. भातकुली शहरातही वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले आहे. 
अचानक आलेल्या वादळासह पावसाने नागरिकांची त्रेधा उडाली. अनेक परिसरातून रस्त्याने पाणी वाहिले. वादळ शमताच मान्सूनपूर्वीच्या पावसाचा बच्चेकंपनीने आनंद लुटला. संचारबंदी असल्याने रस्त्यांवर तुरळक वाहन असल्याने कुठलेच नुकसान झाले नसल्याचे दिसून आले. 

२२ पर्यंत ढगाळ वातावरण राहणार कायम
अरबी समुद्रातील चक्रीवादळ तसेच विदर्भावर असलेले चक्राकार वारे आणि अन्य हवामान शास्त्रीय परिस्थितीमुळे विदर्भात पुढील पाच दिवस कमी-जास्त प्रमाणात पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यात ढगाळ वातावरण २२ तारखेपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. तापमानात विशेष बदल नसल्याची माहिती हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी दिली.

पावसानंतर अंगाला लागल्या घामाच्या धारा
वेगवान वाऱ्यांनी धडकी भरवली, त्यानंतरच्या पावसामुळे काही मिनिटांसाठी गारवा तयार झाला. मात्र, दुपारी २ पासून पुन्हा सूर्याने दर्शन दिले. यादरम्यानच्या काळात हवा वाहत नसल्याने दमट वातावरणाचा अनुभव  अमरावतीकरांनी घेतला. अंगावरून घामाच्या धारा वाहत असताना, वीज गूल झाल्याने प्रत्येक क्षण जिवाची तगमग वाढवित होता.   राजकमल, एल.आय.सी. श्रीकृष्ण पेठ, मोरबाग, वडाळी, बडनेरा, टाऊन-३ आणि लक्ष्मीनगर फीडरवरून शहराला होणारा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे महावितरणचे फोन खणखणत होते. 

 

Web Title: The storm hit the city, cars crushed under the trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस