वादळामुळे झाडे कोलमडली, संत्र्याचा सडा जमिनीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:12 AM2021-04-20T04:12:59+5:302021-04-20T04:12:59+5:30
नांदगाव खंडेश्वर : बुधवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास झालेल्या वादळामुळे तालुक्यातील संत्राबागांमध्ये झाडे कोलमडली. झाडावरील लिंबाच्या आकारातील फळे गळली. ...
नांदगाव खंडेश्वर : बुधवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास झालेल्या वादळामुळे तालुक्यातील संत्राबागांमध्ये झाडे कोलमडली. झाडावरील लिंबाच्या आकारातील फळे गळली. वादळाचा वेग प्रचंड असल्यामुळे तोडण्यास आलेल्या लिंबाचीही गळ झाली.
तालुक्यात ८१४ हेक्टरवर संत्राबागा असून, १४० हेक्टरवर लिंबू फळबाग आहे. वादळाचा वेग प्रचंड असल्याने झाडाला लागलेली फळे गळून पडून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांनी हवामानावर आधारित पीक विमा काढला असून, या नुकसानाची त्वरित पाहणी करून पीक विम्याचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
-------------
येणस शिवारात तीन हेक्टर क्षेत्रात ७५० संत्राझाडे आहेत. वादळामुळे शेतातील काही झाडे कोलमडून पडली तसेच आंबिया बहराची गळ झाली आहे, असे येणस येथील शेतकरी मनोज वसंतराव कडू यांनी सांगितले.