ट्रक पार्किंगवरून तुफान दगडफेक; तलवारीही निघाल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 10:24 PM2019-01-01T22:24:24+5:302019-01-01T22:30:53+5:30

नागपुरी गेट पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या डिप्टी ग्राऊंडमध्ये ट्रक पार्किंगच्या मुद्द्यावरून दोन गट परस्परांशी भिडले. यादरम्यान परस्परांवर दगडफेक करण्यात आली. तलवारीही उगारण्यात आल्या. ही घटना मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास उघड झाली. याप्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी दोन गटांतील पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. या घटनेने मुस्लिमबहुल क्षेत्रात मोठी खळबळ माजली होती.

Storm pellet over truck parking; The sword also left | ट्रक पार्किंगवरून तुफान दगडफेक; तलवारीही निघाल्या

ट्रक पार्किंगवरून तुफान दगडफेक; तलवारीही निघाल्या

Next
ठळक मुद्देपाच जण ताब्यात : फायरिंगची अफवा, परिस्थिती तणावपूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नागपुरी गेट पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या डिप्टी ग्राऊंडमध्ये ट्रक पार्किंगच्या मुद्द्यावरून दोन गट परस्परांशी भिडले. यादरम्यान परस्परांवर दगडफेक करण्यात आली. तलवारीही उगारण्यात आल्या. ही घटना मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास उघड झाली. याप्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी दोन गटांतील पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. या घटनेने मुस्लिमबहुल क्षेत्रात मोठी खळबळ माजली होती.
कुणीही या घटनेत जखमी झाले नसले तरी या प्रकाराने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. भरीस भर याच घटनेदरम्यान हवेत गोळीबार झाल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे दहशतीत भर पडली. वाढता तणाव पाहता, पोलिसांनी व्यापक बंदोबस्त तैनात केला. त्यामुळे डिप्टी ग्राऊंड परिसराला पोलीस छावणीला स्वरूप प्राप्त झाले.
वलगाव रस्त्यावरील ट्रान्सपोर्टनगरमध्ये ट्रक पार्क केले जातात. माहितीनुसार, ट्रकचालक मोहसीनखान याचा ट्रक लावणयाच्या कारणावरून अन्य एका चालकाशी वाद झाला. तेथे दोघांमध्ये मारहाण झाली. हा वाद निवळल्यानंतर ज्या ट्रकचालकास मारहाण करण्यात आली. त्याच्या समर्थनार्थ एहफाज अहमद बाहेर पडला. त्याला मोहसीन व त्याचे अन्य साथीदार डिप्टी ग्राऊंड भागात दिसले. तेथे दोघांमध्ये वाद झाला. त्याचे पर्यावसान दगडफेक व परस्परांवर तलवारी उगारण्यापर्यंत झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके व शशिकांत सातव यांच्यासह नागपुरी गेट ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप चव्हाण हे पथकासह घटनास्थळी पोहोचले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी नागपुरी गेट पोलीस ठाण्यासह अन्य ठाण्यांतील पोलीस ताफा तैनात करण्यात आला. क्यूआरटी व दंगा नियंत्रण पथकही सज्ज ठेवण्यात आले. दोन्ही गटांतील १०० ते १५० जण परस्परांसमोर ठाकल्याने तणाव निर्माण झाला. सशस्त्र जमावापैकी काहींनी हवेत गोळीबार केल्याची अफवा पसरली. तथापि, या वादादरम्यान गोळीबार झाल्याच्या वृत्ताचे नागपुरी गेट पोलिसांनी जोरदार खंडन केले.
दरम्यान, वाद निवळल्यानंतर या प्रकाराची माहिती अहफाजला देण्यात आली. मोहसीन हा मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती त्याला देण्यात आल्याने प्रत्युत्तरादाखल अहफाज पहिलवानने सशस्त्र डिप्टी ग्राऊंड परिसरात राहणाऱ्या मोहसीनच्या घरावर हल्लाबोल केला. त्यातून दगडफेक व तलवारी उगारण्यात आल्या.
यांना घेतले ताब्यात
एका गटातील एहफाज अहमद इजाज अहमद (३८, रा. जाकीर कॉलनी) व दुसऱ्या गटातील शेख शौकत शेख ताजू (३४), शेख राजिक शेख असद (३२), शेख हनिफ शेख ताजू (४७) व मोहसीन खान शफीक खान (२०, रा. अंसारनगर) यांच्याविरुद्ध कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ३३६, आर्म अ‍ॅक्ट ४, २५, १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

ट्रक पार्किंगवरुन दोन गटांमध्ये वाद उफाळून आला. वादादरम्यान दगडफेक करण्यात आली. तलवारी निघाल्या. तथापि, या घटनेत कुणीही जखमी झाले नाही.पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. गोळीबार झालेला नाही.
- दिलीप चव्हाण
ठाणेदार, नागपुरीगेट

Web Title: Storm pellet over truck parking; The sword also left

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.