अमरावती जिल्ह्यात वादळाचा पुन्हा तडाखा
By admin | Published: April 13, 2015 01:31 AM2015-04-13T01:31:26+5:302015-04-13T01:31:26+5:30
जिल्ह्यात वादळाचा जोर सुरुच असून रविवारी सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील
झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड : घरावरील टिनपत्रे उडाली, गावांमध्ये काळोख
अमरावती : जिल्ह्यात वादळाचा जोर सुरुच असून रविवारी सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाढोणा रामनाथ परिसरात सोसाट्याचे वादळ सुटल्याने मोठ्या प्रमाणावर झाडे उन्मळून पडली. वादळामुळे काही घरांवरील टिनपत्रे उडाली असून सुमारे १० गावांतील विद्युत पुरवठा खंडित झाला होता.
रविवारी ५.४५ वाजताच्या सुमारास नांदगाव खंडेश्वर तालुक्यात वादळाचे आगमन झाले. पिंपळगाव निपाणी, लोहगाव, शिवरा, सालोड, लोणी टाकळी, दाभा, काजना, राजना, कोहळाजटेश्वर या गावांत वादळाचे थैमान सुरुच होते. वादळामुळे संत्रा, गहू, भाजीपाला व आंब्याचे मोठे नुकसान झाले. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने गावात काळोख पसरला होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. वादळामुळे काही गावांतील दुकानांवरील टिनपत्रे उडाल्याने व्यावसायीकांचे नुकसान झाले. काहींनी रस्त्यावर वाहने उभी केली असता वादळाच्या जोरात वाहने पडलीत. सायंकाळपर्यंत विजांचा कडकडाट सुरुच होता. वादळामुळे पाडाचे आंबे खाली पडल्यामुले मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या परिसरात जवळपास एकतास पाऊस बरसला. नांदगाव येथे ६ वाजता बऱ्याच घरावरील टिनपत्रे उडाली. यात अरुण शिंदे, गोपाल मासोदकर यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
दर्यापूर तालुक्यात गारपीट
तालुक्यात रविवारी सायंकाळी ५.३० वाजता वादळाचे आगमण झाले. धामक येथे हरभऱ्याच्या आकाराची गारदेखील पडली. वादळामुळे रस्त्यावरील मोठमोठी वृक्ष धाराशाही झाली. येवदा येथेही काहीवेळ पावसाच्या सरी बरसल्या. सध्या रबी हंंगामाचे पीक शेतकऱ्यांच्या घरात आले असून पुढील खरिप हंगामासाठी शेतीची मशागत सुरु आहे. रविवारच्या पावसामुळे उकाडा कमी झाल्याने नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)