तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्रामीण आरोग्य यंत्रणा करा बळकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2022 05:00 AM2022-06-08T05:00:00+5:302022-06-08T05:00:51+5:30

राज्यमंत्री कडू म्हणाले की, धारणी चिखलदराबरोबरच लगतच्या अचलपूर, चांदूर बाजार, अकोट येथील रुग्णालयांतही अद्ययावत तंत्रज्ञान प्रणाली विकसित करावी.  रुग्णालयांमध्ये डिजिटल कक्षाची उभारणी करण्यात यावी. तांत्रिकदृष्ट्या या कक्षात सर्व सुविधांची निर्मिती करण्यात यावी. सर्व तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून दूरदृष्यप्रणालीद्वारे त्यांच्या उपलब्धतेच्या वेळापत्रकानुसार रुग्णांवर उपचार करावेत. याबाबतचे माहिती देणारे फलक रुग्णालयांमध्ये लावण्यात यावेत.

Strengthen the rural health system with the help of technology | तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्रामीण आरोग्य यंत्रणा करा बळकट

तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्रामीण आरोग्य यंत्रणा करा बळकट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ग्रामीण भागातील नागरिकांना विशेषोपचार व कुशल तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान प्रणाली व यंत्रणेचा वापर करावा. धारणी व चिखलदरासारख्या  दुर्गम भागातील रुग्णालयांमध्ये टेलिमेडिसीन प्रणाली सुरळीत व नियमित करावी. तेथील नागरिकांना मुंबई, पुणे, नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्टरांचे उपचार मिळवून द्यावेत, त्याचप्रमाणे प्रायोगिक तत्त्वावर ग्रामीण भागात टेलिमेडिसीन सेवा सुरु होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री बच्चू कडू यांनी दिले.
जलसंपदा राज्यमंत्र्यांनी आरोग्य विभाग, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाचा आढावा मंगळवारी शासकीय विश्रामगृहात स्वतंत्र बैठकांद्वारे घेतला. त्यावेळी ते बोलत होते.  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. सुरेंद्र ढोले, चिखलदरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पवार, डॉ. रवींद्र चव्हाण, चुरणीचे वैद्यकीय अधीक्षक रामदेव वर्मा आदी उपस्थित होते.
योग्य नियोजन करण्यात यावे
राज्यमंत्री कडू म्हणाले की, धारणी चिखलदराबरोबरच लगतच्या अचलपूर, चांदूर बाजार, अकोट येथील रुग्णालयांतही अद्ययावत तंत्रज्ञान प्रणाली विकसित करावी.  रुग्णालयांमध्ये डिजिटल कक्षाची उभारणी करण्यात यावी. तांत्रिकदृष्ट्या या कक्षात सर्व सुविधांची निर्मिती करण्यात यावी. सर्व तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून दूरदृष्यप्रणालीद्वारे त्यांच्या उपलब्धतेच्या वेळापत्रकानुसार रुग्णांवर उपचार करावेत. याबाबतचे माहिती देणारे फलक रुग्णालयांमध्ये लावण्यात यावेत. बालरोग, स्त्रीरोग, हृदयरोग, यकृत, मेंदू रोग, मानसिक आजार, जुनाट आजार आदी आजांरावर उपचार करण्याऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करण्यात यावे. यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीची मदत घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. टेलिमेडिसीन सेवा अव्याहत चालण्यासाठी इंटरनेट सेवा सुरळीत असणे आवश्यक आहे. तशी सुविधा उभारण्याचे निर्देश त्यांनी दिले. राज्यमंत्र्यांनी बांधकाम विभागाच्या विविध कामांचा आढावा घेतला.  

 

Web Title: Strengthen the rural health system with the help of technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.