प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी धडक मोहीम
By admin | Published: April 23, 2017 12:28 AM2017-04-23T00:28:16+5:302017-04-23T00:28:16+5:30
प्लास्टिकचा वापर कमी व्हावा, यासाठी शेंदूरजनाघाट नगरपरिषदेच्यावतीने धडक मोहीम राबविण्यात येत आहे.
शेंदूरजनाघाट : प्लास्टिकचा वापर कमी व्हावा, यासाठी शेंदूरजनाघाट नगरपरिषदेच्यावतीने धडक मोहीम राबविण्यात येत आहे. यात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक च्या बॅग व अन्य वस्तू वापरू नये, अशा सूचना केल्या जात आहेत.
नगर परिषदेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने २१ एप्रिल रोजी पालिका कर्मचाऱ्यांच्यावतीने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी धडक मोहीम राबविली.
यामध्ये मुख्य मार्केटमधील सर्व व्यापारी तसेच छोटेमोटे पानटपरी तसेच हॉटेल्स, चहाटपरी या सर्व व्यापाऱ्यांना धडक मोहिमेद्वारे प्रत्यक्ष भेटी देऊन ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पन्न्या वापरण्याचे टाळण्याबाबत सूचना देण्यात आल्यात. यानंतर जर आपल्या दुकानामध्ये अशा कमी मायक्रॉन प्लास्टिक वापरल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल व दंडसुद्धा आकारण्यात येईल, अशासुद्धा सूचना या धडक मोहिमेद्वारे देण्यात आल्यात. यावेळी नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)