कर्जमाफीसाठी प्रहारचे ‘जेलभरो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 01:36 AM2019-08-01T01:36:17+5:302019-08-01T01:36:50+5:30
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमजुरांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने बुधवारी जेलभरो आंदोलन करण्यात आले. जिल्हा कचेरीवर धडक देत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमजुरांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने बुधवारी जेलभरो आंदोलन करण्यात आले. जिल्हा कचेरीवर धडक देत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
स्थानिक गाडगेनगर स्थित संत गाडगेबाबा समाधी स्थळ ते जिल्हा कचेरीदरम्यान मोर्चा निघाला. यावेळी राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. ‘जय जवान, जय किसान’, ‘शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे’ अशा घोषणांनी जिल्हा कचेरी परिसर दणाणून सोडला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने सकाळी १० पासूनच जिल्हाधिकारी कार्यालयाला घेरले होते. मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकताच प्रहारच्या शिष्टमंडळाने विविध १५ मागण्यांचा समावेश असलेले निवेदन आरडीसी नितीन व्यवहारे यांना सादर केले. यावेळी जिल्हाध्यक्ष मंगेश देशमुख, बंडू जवंजाळ, वसू महाराज, अजय राऊत, प्रदीप बंड, राजाभाऊ किटुकले, शाम कडू, विशाल बंड, चंदू खेडकर, जोगेंद्र मोहोड, दीपक धोटे आदींनी मागण्यांचे निवेदन सादर करताना शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न, समस्या प्रशासन दरबारी मांडल्या.