एसटी टिप्परवर धडकली चालक गंभीर, १२ जखमी
By admin | Published: March 5, 2016 12:19 AM2016-03-05T00:19:01+5:302016-03-05T00:19:01+5:30
एसटी टिप्परवर धडकल्याने चालक गंभीर तर १२ प्रवासी जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास नांदगाव पेठ पोलीस ठाण्यांतर्गत रहाटगावनजीक घडली.
रहाटगावनजीकची घटना : टिप्परचालक ताब्यात
अमरावती : एसटी टिप्परवर धडकल्याने चालक गंभीर तर १२ प्रवासी जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास नांदगाव पेठ पोलीस ठाण्यांतर्गत रहाटगावनजीक घडली.
नागपूर आगाराची एसटी एम.एच. ४०-वाय-५११६ अमरावतीकडे येत होती. दरम्यान रहाटगावजवळील मार्गावर टिप्पर एम.एच. ३४-एम.-१६३ ने अचानक ब्रेक मारल्यामुळे एसटी टिप्परवर धडकली. अपघातानंतर टिप्पर चालक टिप्पर घेऊन पसार झाला. या अपघातात चालक मधुकर आनंद चव्हाण (५६, रा. नागपूर) गंभीर जखमी झाला असून वाहक संगीता रसिक कारियासह १२ प्रवासी किरकोळ जखमी झालेत. जखमींमध्ये पद्मा विश्वनाश धनवंत (५४, रा. अचलपूर), संजय रामचंद्र जोगे (३८, रा.मोझरी), कोकीळा शंकर वाकडे (६५, रा.अचलपूर), गंगूबाई प्रल्हाद नागलकर (६७, रा. अचलपूर), सुमीत देवानंद पवार (१९, रा. तिवसा), गौरव सोनुले यांचा समावेश आहे. अचानक ब्रेक दाबल्याने एसटीमधील प्रवासी सिटच्या लोखंडी बारवर आदळले. यामध्ये बहुतांश प्रवाशाच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली. काही जणांचे ओढ तर काही जणांचे दात सुध्दा या अपघातात तुटले. घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी चालक-वाहकासह प्रवाशांचे बयाण नोंदविले. पोलिसांनी टिप्पर चालकाला ताब्यात घेतले असून अपघाताच पुढील चौकशी सुरु आहे. (प्रतिनिधी)