प्रहारचा विद्युत कार्यालयावर मोर्चा
By Admin | Published: November 11, 2016 12:34 AM2016-11-11T00:34:20+5:302016-11-11T00:34:20+5:30
तालुक्यातील टेंभा या गावी रोहित्र नसल्यामुळे ऐन हंगामाच्या दिवसांत शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
आश्वासन : दोन दिवसांत अंमलबजावणीला सुरूवात
अमरावती : तालुक्यातील टेंभा या गावी रोहित्र नसल्यामुळे ऐन हंगामाच्या दिवसांत शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे गुरुवारी प्रहार संघटनेने शेतकऱ्यांसोबत विद्युत कार्यालयावर मोर्चा काढला. अधिकाऱ्यांसमक्ष प्रहार ने शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्यानंतर दोन दिवसांत रोहित्र बसविण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहे.
सध्या शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत असून सोयाबीन पिकाने उत्पादन खर्चही पार केला नाही. त्यात हंगामी पिकांवर शेतकऱ्यांची मदार असल्याने अशा वेळी विजेचा कमी दाब असतो व पर्यायी मोटरपंप बंद पडतात. भरपूर पाण्याची गरज असताना विजेच्या समस्येमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रहारचे जिल्हाध्यक्ष छोटू महाराज वसू व तालुकाध्यक्ष जोगेंद्र मोहोड यांना शेतकऱ्यांनी आपबीती सांगितल्याने गुरुवारी वसू व मोहोड यांच्या नेतृत्वात टेंभा येथील शेतकऱ्यांनी मोर्चा काढून विद्युत अभियंता बेथरिया यांच्यासमक्ष नवीन रोहित्रासंबंधी निवेदन देऊन आंदोलनात्मक पवित्रा घेतला.
अधिकाऱ््यांनी शेतक?्यांची बाजू समजून घेऊन शेतक?्यांच्या या रास्त मागणीसाठी येत्या दोन दिवसात रोहित्र बसविण्याचे आश्वासन दिले.यावेळी निवेदन देतांना प्रहारचे छोटू महाराज वसु, जोगेंद्र मोहोड गजानन मोहोड यांचे सह पंडित ठाकरे,गजानन ठाकरे,अविनाश राऊत, गजानन गिरी,किरण ठाकरे, बाबुराव ठाकरे, श्रीधर ठाकरे, रघुनाथ ठाकरे, नितीन लाडविकर,राहुल ठाकरे, सचिन माहोरे आदी शेतकरी उपस्थित होते.