चांदूर रेल्वेत पंचायत समितीमध्ये शालेय पोषण आहार कामगारांचा संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:14 AM2021-09-26T04:14:50+5:302021-09-26T04:14:50+5:30

फोटो - संप २५ ओ चांदूर रेल्वे : पंचायत समितीमध्ये शुक्रवारी शालेय पोषण आहार कामगारांनी संप व धरणे आंदोलन ...

Strike of school nutrition workers in Chandur Railway Panchayat Samiti | चांदूर रेल्वेत पंचायत समितीमध्ये शालेय पोषण आहार कामगारांचा संप

चांदूर रेल्वेत पंचायत समितीमध्ये शालेय पोषण आहार कामगारांचा संप

Next

फोटो - संप २५ ओ

चांदूर रेल्वे : पंचायत समितीमध्ये शुक्रवारी शालेय पोषण आहार कामगारांनी संप व धरणे आंदोलन केले. यामध्ये विविध मागण्यांचे निवेदन स्थानिक खंडविकास अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे नेते देविदास राऊत यांनी केले.

शालेय पोषण आहार कामगारांना किमान वेतन लागू करा व १८ हजार रुपये दरमहा मानधन द्या, सेंट्रल किचनचे धोरण मागे घ्या, सर्व कामगारांना कामावर कायम करा, कामगार म्हणून दर्जा द्यावा आदी मागण्यांचा समावेश होता. सदर मागण्यांचे निवेदन खंडविकास अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. यावेळी शालेय पोषण आहार कामगार संघटना (सीटू) चांदूर रेल्वे तालुकाध्यक्ष मंदा नंदरधने, सदस्य रेखा गवई, धरती बोरकर, पद्मा सोनोने, वनिता नेवारे, अनिता मोरे, रत्नमाला ढोकणे, कुसुम मडावी, रजनी अग्रवाल, वंदना कडूकार, नलिनी कळमकार आदींची उपस्थिती होती.

250921\1238-img-20210925-wa0006.jpg

photo

Web Title: Strike of school nutrition workers in Chandur Railway Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.