सातबारा कोरा करा प्रहारची कलेक्ट्रेटवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 12:07 AM2017-12-08T00:07:17+5:302017-12-08T00:08:01+5:30
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करा यासह अन्य मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाद्वारा जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरूवारी धडक दिली व मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना देण्यात आले.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करा यासह अन्य मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाद्वारा जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरूवारी धडक दिली व मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना देण्यात आले.
बोंड अळीने उद्वस्त झालेल्या कापूस उत्पादकांना एकरी २५ हजार रुपये भरपाई द्यावी. संत्रा उत्पादकांना हेक्टरी एक लाखाचे अनुदान द्यावे, शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे बिल माफ करून २४ तास वीजपुरवठा करावा, स्वामीनाथन आयोग लागू करा व पेरणी ते कापणीची कामे मनरेगातून करा, आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष मंगेश देशमुख, वसू महाराज, नंदू विधळे, प्रदीप बंड, राजेश वाटाने, प्रदीप वडतकर, प्रवीण हेंडवे, श्याम मसराम, शारदा पवार, दुर्गाबाई पिसे, योगिता जयस्वाल, संतोश किटकुले, अभिजित बोंडे, वनमाला गणोरकर, सुनीता झिंगरे, मनीषा सोलव, मनोज जयस्वाल, सुभाष मेश्राम आदी उपस्थित होते.