अंबानगरीत पावसाचे दमदार आगमन

By Admin | Published: June 26, 2017 12:18 AM2017-06-26T00:18:47+5:302017-06-26T00:18:47+5:30

अंबानगरीत रविवारी मान्सूनच्या दमदार धारा बरसल्या. दुपारी ५.३० वाजतादरम्यान धो-धो पाऊस आला.

Strong arrival of uneven rain | अंबानगरीत पावसाचे दमदार आगमन

अंबानगरीत पावसाचे दमदार आगमन

googlenewsNext

जिल्ह्यात मान्सून दाखल : सोमवारी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अंबानगरीत रविवारी मान्सूनच्या दमदार धारा बरसल्या. दुपारी ५.३० वाजतादरम्यान धो-धो पाऊस आला. या पावसामुळे शेतकरी वर्गांसह नागरिक सुखावले आहे. हजारो शेतकऱ्यांनी अद्याप तरी पेरण्या सुरू केल्या नाहीत. मात्र सर्वत्रिक पावसाची नागरिकांना अपेक्षा लागली आहे. परंतु जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस खऱ्याअर्थाने रविवारी दाखल झाल्याचे प्रतिपादन हवामान खात्याच्यावतीने करण्यात आल्याचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.
रविवारी विदर्भात विखुरलेल्या स्वरूपात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. सोमवारी शहरातील अधिकांश भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तसेच २७ व २८ जून रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे मत हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी व्यक्त केले आहे.
२७ ते २९ जूनदरम्यान सर्वत्रिक पावसाचे आगमन होणार आहे. विदर्भातील अमरावती जिल्ह्यात मान्सून पोहोचल्याचे हवामान खात्याकडून कळविण्यात आल्याचेही बंड यांनी सांगितले. या पावसामुळे सोमवारपासून पेरणीला वेग येणार आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
पश्चिम राजस्थान ते अंदमान समुद्रात कमी दाबाची द्रोणीय स्थिती, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र आणखी ठळक होण्याची शक्यता असून ९ किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत आहे. गुजरात किनारपट्टी ते केरळ कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे. राज्यस्थान तसेच दक्षिण गुजरातवर चक्र ाकार वारे ४ कि मी वाहत आहे. त्यामुळे मध्य भारत, गुजरात, उत्तर भारताच्या काही भागात मान्सून सक्रिय होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. सध्या दक्षिण गुजरात, मुंबई, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूर पूर्व मध्यप्रदेशवर मान्सून सक्रिय झाला आहे.

Web Title: Strong arrival of uneven rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.