जिल्ह्यात अवकाळी पावसाची दमदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 01:25 AM2019-04-18T01:25:11+5:302019-04-18T09:50:02+5:30

जिल्ह्यात मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये चांदूर बाजार तालुक्यात एका युवकाचा मृत्यू झाला. संत्री, केळी, आंबा तसेच भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. अवकाळी पावसासोबत विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारादेखील होता.

The strong presence of rain in the district suddenly | जिल्ह्यात अवकाळी पावसाची दमदार हजेरी

जिल्ह्यात अवकाळी पावसाची दमदार हजेरी

Next
ठळक मुद्देउकाड्यापासून मिळाला दिलासा : बागायती पिकांचे नुकसान, सोसाट्याच्या वाऱ्याने वीजपुरवठा खंडित

अमरावती : जिल्ह्यात मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये चांदूर बाजार तालुक्यात एका युवकाचा मृत्यू झाला. संत्री, केळी, आंबा तसेच भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.
अवकाळी पावसासोबत विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारादेखील होता. अनेक ठिकाणी झाडे वीजतारांवर पडून विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे काही तालुक्यांमध्ये नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. चिखलदरा तालुक्यात अद्याप वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही.
अंजनगाव सुर्जीत केळीला नुकसान
अंजनगाव सुर्जी तालुक्यात रात्री ११ पासून सोसाट्याचा वाºयासह पावसाने हजेरी लावली. पावसामुळे जीवितहानी झालेली नसली तरी बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. केळीची रोपे मुळापासून उखडली तसेच बोराएवढी झालेली संत्री व आंब्याचा खच झाडांखाली लागला.
शेंदूरजना बाजार येथे भिंत पडली
तिवसा तालुक्यात मंगळवारी दुपारी २ व रात्री १२ च्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. शेंदूरजना बाजार येथे घराची भिंत कोसळून निर्मला वाघमारे या किरकोळ जखमी झाल्या. टीव्ही व दोन मोबाइल फुटले. शिरजगाव मोझरी येथे रामेश्वर टोने यांनी शेतात लावलेला कांद्याचा ढीग पावसाच्या तडाख्यात सापडल्याने ७० हजारांचे नुकसान झाले.
मरणासन्न संत्र्याला मिळाले जीवदान
वरूड तालुक्यात अवकाळी पावसामुळे संत्र्याच्या अंबिया बहराची गळती झाली तरी मरणासन्न अवस्थेला पोहोचलेल्या संत्र्याला जीवदान मिळाले, हे विशेष. वादळी वाºयाने शेंदूरजनाघाट, वरूड, बेनोडा, पुसला या परिसरात छपरे उडाली. शेंदूरजनाघाट येथे दिनेश कुºहाडे यांची चहाटपरी वादळाने उडाली. शेंदूरजनाघाट, वाठोडा, राजुराबाजार, पुसला रस्त्यावर झाडे कोसळल्याने रात्रभर विद्युत पुरवठा खंडित झाला होता.
जुळ्या शहरांत पावसाची हजेरी
परतवाडा-अचलपूर शहरासह ग्रामीण भागात मंगळवारी रात्री ९.४० पासून जोरदार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची दैना उडाली. दोन दिवसांपासूनच ढगाळ वातावरण होते. अचलपुरात रात्री २ नंतर वीजपुरवठा सुरळीत झाला.
चिखलदरा अंधारात
विदर्भाचे नंदनवन चिखलदरा येथेसुद्धा मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. तालुक्याच्या ग्रामीण भागात विजांसह सोसाट्याच्या वाऱ्याने थैमान घातले. त्यामुळे वीज तारा तुटल्या. येथील खंडित वीजपुरवठा बुधवारीदेखील बहाल झाला नाही.
चांदूर रेल्वेत मेघगर्जनेसह पाऊस
चांदूर रेल्वे तालुक्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारपासून थोड्या-थोड्या वेळाने पावसाची रिपरिप सुरू झाली होती. रात्री ९ वाजता सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. मध्यरात्रीनंतर पाऊस थांबला.
मोर्शीत पावसाचा करंटेपणा कायम
मोर्शी तालुक्यात मंगळवारीदेखील पावसाने अल्प हजेरी लावून करंटेपणा कायम ठेवला. पावसाळ्यात न बरसलेल्या पावसाने तालुक्यात पाणीटंचाई निर्माण केली आहे. आतादेखील तुरळक पाऊसच झाल्याने तालुकावासीयांच्या अंगाला घामाच्या धारा लागल्या होत्या.
नांदगावात ५ मिमी पाऊस
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ११ एप्रिलला मतदानादरम्यान अवकाळी पाऊस कोसळला. त्यानंतर मंगळवारी पुन्हा पावसाने हजेरी लावली. मात्र, अवघी ५ मिमी एवढी नोंद झाली आहे.
धारणीत वादळी वाºयासह पाऊस
धारणी तालुक्यात मंगळवारी दुपारी व सायंकाळी अचानक वादळी वाºयासह अवकाळी पावासाने हजेरी लावली. दहेंडा, टिंगऱ्या, काल्पीसह परिसरातील आणखी काही आदिवासी खेड्यांत घरावरील टिनाचे छप्पर उडाले व कुडाच्या घरांचे नुकसान झाले. उन्हाळी मुगाचे नुकसान झाले आहे.
दर्यापुरात बुधवारीदेखील पाऊस
दर्यापूर तालुक्यात मंगळवारी रात्री १२ नंतर पाऊस कोसळला तसेच बुधवारी भल्या पहाटे विजेच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. दर्यापूर-अमरावती मार्गावर काही ठिकाणी रस्त्यावर काट्या पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता मोकळा केला. ठिकठिकाणी पाणी साचले होते.
धामणगाव तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा
धामणगाव रेल्वे तालुक्याला मंगळवारी वादळी पावसाने तडाखा दिला. उसळगव्हाण येथील नितीन दगडकर यांच्या गावरान आंबा बागेचे मोठे नुकसान झाले. महिमापूर, वरूड बगाजी या भागात बहरलेल्या आंब्याला फटका बसला. जुना धामणगाव, जळगाव, देवगाव, मलातपूर, बोरवघड परिसरात घरावरील छपरे वादळी वाºयाने उडाली. विजेचा कडकडाट व वादळी पावसामुळे वीजपुरवठा काही तास खंडित झाला होता.
बेलोरा शिवारात वीज कोसळून युवकाचा मृत्यू
चांदूर बाजार तालुक्यातील बेलोरा शिवारातील शेतात काम करणाºया महादेव ऊर्फ मधू गोविंद गायने या युवकाचा मंगळवारी वीज कोसळून मृत्यू झाला. मंगळवारी रात्री तालुक्यात अचानक विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. बºहाणपूर येथील ओंकार शेकार यांच्या बेलोरा शिवारातील शेतात काम करणाऱ्या महादेव गायने (३५, रा. खामला, मध्य प्रदेश) याच्या अंगावर वीज कोसळली. गंभीर भाजला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मोलमजुरी करणाऱ्या महादेवच्या पश्चात पत्नी तुळशी गायने, मुलगा मनोज व मुलगी शारदा असा परिवार आहे. महसूल अधिकारी निवडणूक कामात व्यस्त असल्याने अवकाळी पावसामुळे तालुक्यात किती नुकसान झाले, याबाबत निश्चित आकडा पुढे आलेला नाही तसेच वृत्त लिहिस्तोवर गायने कुटुंबाची अधिकाºयांनी भेट घेतली नसल्याची माहिती पुढे आली आहे.

Web Title: The strong presence of rain in the district suddenly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस