‘स्मार्ट सिटी’ कार्यशाळेला दमदार प्रतिसाद

By admin | Published: November 6, 2015 12:24 AM2015-11-06T00:24:26+5:302015-11-06T00:24:26+5:30

स्मार्ट सिटी उपक्रमात अमरावती शहराचा समावेश झाल्यानंतर नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी पहिल्यांदाच

A strong response to the 'smart city' workshop | ‘स्मार्ट सिटी’ कार्यशाळेला दमदार प्रतिसाद

‘स्मार्ट सिटी’ कार्यशाळेला दमदार प्रतिसाद

Next

अमरावती : स्मार्ट सिटी उपक्रमात अमरावती शहराचा समावेश झाल्यानंतर नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी पहिल्यांदाच गुरुवारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेला अमरावतीकरांचा दमदार प्रतिसाद लाभला. यावेळी तांत्रिक एजन्सीने भविष्यातील अमरावतीचे चित्र प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून रेखाटले.
येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात पार पडलेल्या कार्यशाळेचे उद्घाटन महापौर चरणजित कौर नंदा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. सुनील देशमुख, जिल्हाधिकारी किरण गित्ते, आयुक्त चंद्रकांत गुडेवार, स्थायी समिती सभापती विलास इंगोले, विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर, राष्ट्रवादी फ्रंटचे गटनेता अविनाश मार्डीकर, भाजपचे शहराध्यक्ष तुषार भारतीय, भाजपचे गटनेता संजय अग्रवाल, रिपाइंचे गटनेता प्रकाश बनसोड, बसपच्या गटनेता गुंफाबाई मेश्राम, अजय गोंडाणे, दिगंबर डहाके आदी उपस्थित होते. अतिथींचे स्वागत आयुक्त चंद्रकांत गुडेवार, सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, प्रणाली भोंगे, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर आदींनी केले.

निवड करण्यात आलेल्या जागांना हे आहे महत्व
४क्षेत्र क्र.१. कठोरा
मार्ग : हा अमरावतीच्या उत्तरेकडील पश्चिम भाग आहे. या भागात २५० एकर जमीन उपलब्ध आहे. अमरावती रेल्वे स्टेशन, नागपूर मार्ग व शैक्षणिक संस्था जवळ आहेत तसेच संशोधन केंद्र, कौशल्य बांधणी, अ‍ॅग्रोटेक उद्योग, युवकांच्या कौशल्य क्षमता देखील आहेत.
४क्षेत्र क्र.२ रहाटगाव मार्ग : हा भाग अमरावतीचा उत्तर -पूर्व भाग आहे. या भागात ४५० एकर जमीन अधिग्रहित करता येईल. येथून टेक्सटाईल पार्क जवळ आहे. नागपूर व बडनेरा रेल्वे स्टेशन जवळ आहे. नवीन बायपास लगत हा भाग असल्याने याचे महत्त्व आहे. लघु उद्योग व टेक्सटाईल पार्क अधिनस्त असलेल्या उद्योगांचा विकास करणे आणि अप्पर वर्धा धरणातून अमरावती शहरासाठी पाणीपुरवठा करण्याची क्षमता आहे.
४क्षेत्र क्र. ३. जुना एमआयडीसी भाग : हा भाग अमरावतीचा पूर्व- दक्षिण भाग आहे. ५५० एकर क्षेत्र, १९९२ नुसार औद्योगिक झोन आहे. जुने व नवीन बायपास, विमानतळ आणि बडनेरा रेल्वे स्टेशनला जोडणे, पीण, वीज आदी सुविधा आहेत. या भागात वाहतूक हब, वस्त्रोद्योग, कृषी उद्योगासाठी थेट जे.एन.पी.टी. मार्गे रेल्वे लाईन, कृषी उद्योग तसेच रहिवासी क्षेत्रासाठी आतिथ्य व सेवाक्षेत्रातील विकासाची क्षमता आहे.
४क्षेत्र क्र. ४. बडनेरा : हा भाग शहराचा दक्षिण-पश्चिम भाग आहे. येथे ४५० एकर जागा नवे शहर साकारण्यासाठी उपलब्ध आहे. रिंग रोडशी संलग्न, पश्चिम रहिवासी भाग व रेल्वे स्टेशन जवळ आहे. जलशुध्दीकरण व मलशुध्दीकरण केंद्राचा विकास करण्याची मुभा, मूळ शहराशी रस्त्यामार्फत असलेली जोडणी ही कमकुवत आहे.

कशी हवी स्मार्ट सिटी, इथे नोंदवा सूचना
४‘स्मार्ट सिटी’ उपक्रमबाबत नागरिकांची मते, अभिप्राय समाविष्ट करण्याला प्राधान्य दिले जाईल. त्याकरीता स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात आली असून ेंं१८ू्र३८.ेंू@ॅें्र’.ूङ्मे या संकेतस्थळावर नागरिकांना मते, अभिप्राय नोंदविण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. तसेच एसएमएसची सुविधा देखील दिली आहे. अउर(रस्रंूी) (र४ॅॅी२३्रङ्मल्ल२ ळी७३ ेी२२ँी) करुन ९९७००१३१२ या क्रमांकावर संदेश पाठवावा लागेल.

Web Title: A strong response to the 'smart city' workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.