रचना सहायक ‘ट्रॅप’; ७५०० रुपयांची लाच घेताना अटक, एसीबीची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 02:39 AM2023-09-12T02:39:59+5:302023-09-12T02:41:04+5:30
यातील तक्रारकर्ता हे अभियंता असून, त्यांच्या अशिलाच्या शेतीचे वाणिज्य प्रयोजनार्थ अकृषकचे ऑनलाईन प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयामागील सहायक संचालक, नगररचना विभागात दाखल आहे.
अमरावती: शेतीचे कमर्शियल एनए करण्याचे प्रकरण पुढे पाठविण्याकरीता ७५०० रुपयांची लाच घेणारा रचना सहायक एसीबीने ट्रॅप केला. सोमवारी त्याला सहायक संचालक, नगररचना कार्यालयातच रंगेहाथ अटक करण्यात आली. परमेश्वर पांडुरंग गाडगीळ (३१, ह. मु. अमरावती, मुळ गाव, इटलापूर देशमुख, जि. परभणी) असे लाचखोर रचना सहायकाचे नाव आहे.
यातील तक्रारकर्ता हे अभियंता असून, त्यांच्या अशिलाच्या शेतीचे वाणिज्य प्रयोजनार्थ अकृषकचे ऑनलाईन प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयामागील सहायक संचालक, नगररचना विभागात दाखल आहे. ते प्रकरण पुढे पाठविण्याकरीता गाडगीळने २० हजार रुपये लाच मागत असल्याची लेखी तक्रार त्या अभियंत्यांने एसीबीकडे दाखल केली. ११ सप्टेंबर रोजी एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता त्याने ७५०० रुपये लाचेेची मागणी करत ती स्विकारण्याचे मान्य केले. काही वेळाने त्याने ती लाचेची रक्कम घेतली. तेथेच त्याला एसीबीने रंगेहाथ पकडले. त्याच्याविरूध्द गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक मारूती जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक सतिश उमरे, पोहेकॉं प्रमोद रायपुरे, राहुल वंजारी, आशिष जांभोळे व शैलेश कडू यांनी ही कारवाई केली.