संघर्षातून ‘त्या’ तिघींची आकाशभरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 10:27 PM2018-09-29T22:27:39+5:302018-09-29T22:28:19+5:30

घरात शिक्षणाचा गंध नाही, त्यात कुणाचेच मार्गदर्शन नाही; पण आकाशाला गवसणी घालण्याची जिद्द होती. त्याच्या बळावर असंख्य अडचणींवर मात करीत सख्ख्या तिघी बहिणींनी क्रीडा क्षेत्रात दरारा निर्माण केला. रॅकेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या दोघी आणि पैलवानी करणाºया लहानगीचा प्रवास थक्क करणारा आहे.

From the struggle 'that' the triumphant skyline of the three | संघर्षातून ‘त्या’ तिघींची आकाशभरारी

संघर्षातून ‘त्या’ तिघींची आकाशभरारी

Next
ठळक मुद्देहिरपूरच्या बहिणीचा थक्क करणारा प्रवास : क्रीडा क्षेत्रात नावलौकिक

मोहन राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : घरात शिक्षणाचा गंध नाही, त्यात कुणाचेच मार्गदर्शन नाही; पण आकाशाला गवसणी घालण्याची जिद्द होती. त्याच्या बळावर असंख्य अडचणींवर मात करीत सख्ख्या तिघी बहिणींनी क्रीडा क्षेत्रात दरारा निर्माण केला. रॅकेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या दोघी आणि पैलवानी करणाºया लहानगीचा प्रवास थक्क करणारा आहे.
धामणगाव रेल्वे तालुक्यातील दोन हजार लोकवस्तीच्या हिरपूर येथील शेतमजुरी करणाºया बोंडेकार कुटुंबातील विजया, आरती, हर्षाली या तिघी शालेय क्रीडा स्पर्धेत विभागस्तरावर बॉल बॉडमिंटन या खेळामध्ये जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत. हातावर आणून पानावर खाणारे पुरुषोत्तम बोंडेकार यांनी शेतमजुरीवरच तिन्ही मुलींना उच्च शिक्षण घेता यावे, त्यांना कुठल्याही बाबतीत अडचणी निर्माण होऊ नये, यासाठी धडपड चालविली आहे. त्यांच्या श्रमाचे चीज काही अंशी झाल्याचे समाधान त्यांच्या चेहºयावर झळकू लागले आहे.
विजया, आरतीची अशीही विजयश्री
बोंडेकर कुटुंबातील सर्वांत मोठी विजया ही आर.के. विद्यालय पुलगाव येथे नवव्या वर्गात शिकते. दुसºया वर्गापासून तिने बॉल बॉलमिंटन खेळात इच्छा दर्शवून उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्या खेळाविषयी गोडी वाढत गेली. पाच सुवर्णपदके तिच्या खात्यात जमा झाले आहेत. दररोज दोन तास मैदानावर सराव व चार तास अभ्यास ती करते. याच विद्यालयात सहावीत शिकणारी आरती बोंडेकार हिने याच खेळात तीन कांस्य पदके पटकाविली. विजया ही १९ वर्षांखालील गटात, तर आरती चौदा वर्षांखालील गटात विभागीय स्तरावर प्रतिनिधीत्व करणार आहेत.
हर्षालीचा खडतर प्रवास
इयत्ता दुसऱ्या वर्गापासून कब्बड्डी स्पर्धेत नावलौकिक मिळवणारी हर्षाली बोंडेकार हिचा प्रवास अतिशय खडतर आहे. अनेक वेळा पाय व हाताला गंभीर जखमा तिला झाल्या. अखेर आपल्या खेळात बदल करीत तिने ४०० मीटर शर्यतीत नैपुण्य प्राप्त केले. तीही शालेय स्पर्धेत विभागीय स्तरावर जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे.

आम्हा तिन्ही बहिणींना गाव व तालुक्याचे नाव मोठे करायचे आहे. क्रीडाक्षेत्रात नाव कमवायचे आहे. त्यासाठी हा जिद्दीचा प्रवास आहे.
- विजया बोंडेकार
बॅडमिंटनपटू

Web Title: From the struggle 'that' the triumphant skyline of the three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.