कोरोनाविरोधात गावांचा लढा तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:15 AM2021-06-09T04:15:43+5:302021-06-09T04:15:43+5:30

शासन व प्रशासनाच्या माध्यमातून कोविड सेंटर सुरू करण्यास ग्रामीण भागातून कोरोना हद्दपार करण्यास सुरुवात झाली. आरोग्य कर्मचारी, आशा सेविका ...

The struggle of the villages against the Corona intensified | कोरोनाविरोधात गावांचा लढा तीव्र

कोरोनाविरोधात गावांचा लढा तीव्र

Next

शासन व प्रशासनाच्या माध्यमातून कोविड सेंटर सुरू करण्यास ग्रामीण भागातून कोरोना हद्दपार करण्यास सुरुवात झाली. आरोग्य कर्मचारी, आशा सेविका आणि ग्राम दक्षता समितीची गावावर लक्ष ठेवून आहेत. कोरोना रुग्ण आढळल्यास तातडीने संबंधिताच्या संपर्कातील व्यक्तींची तात्काळ चाचणी व बाधितांवर उपचार सुरू केले जात आहेत. सोबतच अनेक गावांत संस्थात्मक विलगीकरण केंद्रे सुरू केली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना चांगला दिलासा मिळत आहे.

कोरोनाच्या पहिला लाटेपासून जिल्हा परिषदेने आपली संपूर्ण यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवली आहे. अडचणीवर मात करत अनेक गावातील गावकऱ्यांनी कोरोनाला वेशीबाहेर रोखण्यात यश मिळविले आहे. ग्रामीण भागांमध्ये आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देतानाच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी जनजागृती व अन्य उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हा परिषदेच्या यंत्रणेमार्फत अनेक गावांत संस्थात्मक विलीनीकरण केंद्रे सुरू करण्यात आली. आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. त्याचबरोबर एखाद्या नागरिकामध्ये कोरोनाची लक्षणे आढळली, तर त्याचा तात्काळ स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवला जातो. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास संबंधितास तात्काळ उपचारासाठी साठी दाखल केले जाते. यामुळे कोरोना रुग्णांवर लवकर उपचार सुरू होण्यास मदत होते. ग्रामीण भागातील रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत, यासाठी जिल्हा परिषदेने केअर सेंटर सुरू करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी जिल्हा परिषदेने औषधे तसेच वैद्यकीय साहित्य पुरवठा केला आहे. सध्या जिल्ह्यात कोरोना संक्रमण नियंत्रणात असले तरी त्याचा शिरकाव नव्याने होऊ नये, यासाठी ग्राम दक्षता समित्या लक्ष ठेवून आहेत.

बॉक्स

आरोग्य विभागात नियमित कामकाज

संपूर्ण जिल्ह्याची आकडेवारी एकत्रित करणारा जिल्हा परिषदेतील तांत्रिक विभाग हा नेहमीच पडद्यामागे काम करीत असतो. त्यांच्याकडे कोरोना घरोघरी सर्वेक्षण, कोविड सेंटर, म्युकरमायकोसिसवर उपचार, लसीकरणाच्या आकडेवारीची जबाबदारी स्वतंत्रपणे सोपविण्यात आली आहे. प्रशासकीय माहितीची प्रक्रिया हाताळण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांच्या मार्गदर्शनखाली अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रेवती साबळे, डॉ. दिलीप चऱ्हाटे, डॉ. मनीषा सूर्यवंशी, डॉ. प्रिया सिंह, डॉ. विनोद करंजीकर, मनीष हटवार, सिरसाट, मीनल भारती, विजय राठोड, अंकुश शेंडे, कोमल पांडे, शीतल भारती, विशाल ठाकरे, डॉ. काशिफ अन्वर, डॉ. अस्मा, डॉ. सरकटे, शुभम गायकवाडा यांच्यासह अन्य कर्मचारी यासाठी नियमित परिश्रम घेत आहेत.

बॉक्स

तालुका सक्रिय रुग्ण मृत्यू

अमरावती १४६ ४९

भातकुली ७४ २८

मोशी २७९ ८८

वरूड २८२ १४२

अंजनगाव सुर्जी २३१ ७३

अचलपूर ११३ १४९

चांदूर रेल्वे १८१ ४८

चांदूर बाजार १८३ ५६

चिखलदरा १६ १४

धारणी १९६ २३

दर्यापूर २०९ ५१

धामणगाव रेल्वे २१२ ४३

तिवसा १५८ ६०

नांदगाव खंडेश्वर २२९ ४८

एकूण २५०९ ८७२

Web Title: The struggle of the villages against the Corona intensified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.