तंटामुक्तीच्या अध्यक्षाला मारहाण
By admin | Published: January 25, 2017 12:18 AM2017-01-25T00:18:59+5:302017-01-25T00:18:59+5:30
पेठइतबारपूर येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजय महादेव हांडे यांना दर्यापूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत दोन पोलीस शिपायांनी मारहाण केल्याप्रकरणी ...
रेतीच्या वाहतुकीचे प्रकरण : पोलीस ठाण्यासमोर उपोषण, कारवाईची मागणी
दर्यापूर : पेठइतबारपूर येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजय महादेव हांडे यांना दर्यापूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत दोन पोलीस शिपायांनी मारहाण केल्याप्रकरणी सदर पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, याकरिता संजय हांडे बुधवारपासून पोलीस स्टेशनच्या समोरच आमोरण उपोषणाला बसले आहे.
काही दिवसांपूर्वी पेठइतबारपूर येथील संजय हांडे यांना येथे पोलीस शिपाई तुषार गावंडे व गजानन दाभणे विनाकारण मारहाण केल्याची तक्रार हांडे यांनी ठाणेदार व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे दिली आहे. पण याची चौकशी न करता वरिष्ठांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे पदाचा दुरुउपयोग करून सदर पोलिसांना हांडे यांना अमानुषपणे मारहाण केली असल्याची तक्रार त्यांनी वरिष्ठांना दिली. न्याय मिळण्यासाठी २४ जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांची ताराबंळ उडाली आहे.
३० डिसेंबरच्या रात्री हांडे नाव लिहिलेला असलेला रेतीचा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला. येथून काही नागरिक रेतीमाफिया अवैध उत्खन्न करून रेतीची वाहतूक करतात. सदर तस्करी ही पोलिसांच्या आशीर्वादामुळेच होत असल्याने याला हांडे यांनी विरोध केला असता, त्याला पोलीस ठाण्यामध्ये बोलावून पैशाची मागणी करण्यात आली. त्यानंतर अवैध उत्खन्नाला विरोध करशील तर बघ, असे धमकावून मारहाण केल्याचे संजय हांडे यांनी पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तक्रारकर्ता हांडेसह पाच जणांविरुद्ध रेती प्रकरणाचे गुन्हे दाखल केलेत.
या प्रकरणात ठाणेदार दर्यापूर यांनी तक्रारकर्ता व सदर दोन पोलीसांचे बयानही नोंदविले होते. पण २० ते २२ दिवसापासुन कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे हांडे यांनी आमोरण उपोषण सुरु केले आहे. (तालुका प्रतिनिधी)
मी गावाचा तंटामुक्ती समितीचा अध्यक्ष आहे. गावातील अवैध रेतीच्या वाहतुकीला विरोध केल्याने मलाच खोटे गुन्ह्यात अडकवून मारहाण करण्यात आली व पैशाची मागणी केली. त्या ट्रॅक्टरवर हांडे नाव लिहिले होते. पण, माझा नव्हता. याप्रकरणी मला न्याय द्या.
- संजय हांडे, उपोषण कर्ता