एसटीची पार्सल सेवा बंद, व्यावसायिकांची धावाधाव, खासगी एजन्सीसोबतचा करार महामंडळाने गुंडाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 06:17 PM2017-12-25T18:17:45+5:302017-12-25T18:18:21+5:30
एसटी महामंडळाने खासगीकरणात दिलेली पार्सल सेवा अचानक बंद केली. एजन्सीने कराराचा भंग केल्याचा दावा करीत एसटी महामंडळाने करार मोडीत काढला आहे. यामुळे पार्सल पाठविणा-यांना खासगी कुरिअरचा शोध घ्यावा लागत आहे.
अमरावती : एसटी महामंडळाने खासगीकरणात दिलेली पार्सल सेवा अचानक बंद केली. एजन्सीने कराराचा भंग केल्याचा दावा करीत एसटी महामंडळाने करार मोडीत काढला आहे. यामुळे पार्सल पाठविणा-यांना खासगी कुरिअरचा शोध घ्यावा लागत आहे.
राज्य परिवहन महामंडळाची पार्सल सेवा स्थापनेपासून कार्यरत आहे. यासाठी पूर्वी एसटीच्या आस्थापनेवर हमाल हा कर्मचारी संवर्ग कार्यरत होता. राज्याच्या कानाकोप-यात भरवशाने पोहोचणारी म्हणून एसटीच्या पार्सल सेवेची ख्याती होती. मात्र, एसटी महामंडळाने पार्सल सेवेचे खासगीकरण करीत २०१२ मध्ये अंकल पार्सल सर्व्हिसेफ या खासगी संस्थेला ही पार्सल सेवा बहाल केली. आता अंकल सर्र्व्हिसेफने कराराचा भंग केल्याचा ठपका ठेवून महामंडळाने या एजन्सीकडून ही सेवा काढून घेतली आहे. सध्या आलेल्या पार्सलचे पूर्णपणे वितरण होईपर्यंत या संस्थेला मोकळे होता येणार नाही. मात्र, नव्याने कुठलेही पार्सल घेण्यास कंपनीला मज्जाव करण्यात आला आहे.
अचानक सेवा बंद झाल्याने एसटीने पार्सल पाठविणाºया शेकडो व्यावसायिकांची पंचाईत झाली आहे. या व्यावसायिकांना ऐनवेळी खासगी कुरिअरकडे धाव घ्यावी लागत आहे. दरम्यान, एसटी महामंडळ नवीन एजन्सीकडे हे काम सोपविणार असल्याची चर्चा होत आहे.