विज्ञान शाखेत प्रवेश मिळाला नाही; विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल
By प्रदीप भाकरे | Published: November 29, 2022 03:16 PM2022-11-29T15:16:45+5:302022-11-29T15:17:35+5:30
डॉक्टर बनण्याचा स्वप्नभंग; न्युनगंड, वैफल्याने ग्रासले अखेर..
अमरावती : दहावीमध्ये अपेक्षेनुरूप गुण न मिळाल्याने तिला विज्ञान शाखेत प्रवेश घेता आला नाही. किंबहूना तो मिळाला नाही. परिणामी, डॉक्टर बनण्याचे तिचे स्वप्न गारद झाले. ती वैफल्यग्रस्त झाली. तिच्यात न्युनगंड निर्माण झाला. ती एकाकी राहू लागली. अखेर तिने घरी कुणी नसल्याची संधी साधत जीवनयात्रा अकाली संपविली.
हृद्याची पीळ देणारी ही घटना भातकुली तालुक्यातील विर्शी येथे २७ नोव्हेंबर रोजी घडली. गायत्री तुकाराम शेंडे (१६, विर्शी) असे त्या मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वलगाव पोलिसांनी तिच्या पित्याच्या तक्रारीवरून २८ नोव्हेंबर रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. तिच्या पित्याच्या बयाणावरून तिच्या आत्महत्येमागील अकल्पित सत्य उघड झाले.