विद्यार्थ्यांनी साजरा केला अनोखा ‘प्रेमदिन’

By Admin | Published: February 15, 2016 12:39 AM2016-02-15T00:39:55+5:302016-02-15T00:39:55+5:30

कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचा हिमतीने सामना करणाऱ्या अनेक बहाद्दरांना जगण्याचे बळ मिळावे,

Students Celebrate Unique 'Prem Din' | विद्यार्थ्यांनी साजरा केला अनोखा ‘प्रेमदिन’

विद्यार्थ्यांनी साजरा केला अनोखा ‘प्रेमदिन’

googlenewsNext

प्रयास सेवांकुरचा उपक्रम : कॅन्सरपीडितांच्या मदतीसाठी केले रद्दी संकलन
अमरावती : कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचा हिमतीने सामना करणाऱ्या अनेक बहाद्दरांना जगण्याचे बळ मिळावे, उपचारांकरिता थोडीफार आर्थिक मदत मिळावी, या उदात्त हेतुने अंबानगरीतील निवडक तरुणांनी एकत्र येऊन ‘प्रयास सेवांकुर’ संस्थेच्या माध्यमातून शहरातील प्रमुख चौकात रद्दी संकलित केली. ही रद्दी विक्री करून त्यातून कॅन्सरबाधितांना मदत केली जाणार आहे. ‘मानव प्रेम दिन’ अशी संकल्पना घेऊन ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यात आली. या उपक्रमांतर्गत हजारो किलो रद्दी गोळा झाली.

महाविद्यालयीन तरुण एकत्र
अमरावती : व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस. एकीकडे अंबानगरीची तरुणाई हॉटेल्स, चित्रपटगृहे, कॉफी शॉप, आईस्क्रीम सेंटर व उद्याने आदी ठिकाणी ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करीत असताना ‘प्रयास सेवांकुर’ या सामाजिक संघटनेचे संस्थापक अविनाश सावजी यांच्या विचारांनी प्रभावित प्रभावित जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाच्या तरूण-तरुणींनी एकत्र येऊन कॅन्सरपीडित गरजू रूग्णांसाठी हा आगळा उपक्रम राबविला.
रविवारी सकाळपासूनच सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शहरातील अनेक प्रभागातून रद्दी गोळा केली. यासाठी त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांना समुपदेश केले. या उपक्रमामागील उदात्त हेतू समजावून सांगितला. विद्यार्थ्यांनी दुपारी ३ वाजता इर्विन चौकातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रद्दीचे गठ्ठे बांधले.
ही रद्दी विकल्यानंतर यातून जी रक्कम जमा होईल ती प्रयास सेवांकुर केअर फंडात जमा केली जाणार आहे. त्याअंतर्गत कॅन्सरपीडित गरजू व्यक्तींना मदत दिली जाईल. विशेषत: प्रयास सेवांकुर सामाजिक संघटनेच्या अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, जळगाव आदी ठिकाणी शाखा असून रविवारी सर्वच ठिकाणी हा उपक्रम एकाचवेळी राबविण्यात आला.
डॉ.अविनाश सावजी यांच्या मार्गदर्शनाखाली छोटू काका वरणगावकर, स्नेहारिका शिरभाते, मोनाली यावले, हृषीकेश नरखेडे, आश्विनी गुडधे, रंजना नांदुरकर, अश्विन सव्वालाखे, प्रकाश तराळ यांच्यासह शेकडो तरुण-तरुणींनी या सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला.
यावेळी महसूल उपायुक्त रवींद्र ठाकरे यांनी या उपक्रमाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कार्याची स्तुती केली.

Web Title: Students Celebrate Unique 'Prem Din'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.