निवडणूक काळात घेण्यात येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 06:33 PM2024-10-16T18:33:08+5:302024-10-16T18:34:02+5:30

Amravati : विधी अभ्यासक्रमात बदल झाल्याने विद्यार्थ्यांना हवा अभ्यासाला वेळ

Students demand postponement of exams conducted during election period | निवडणूक काळात घेण्यात येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी

Students demand postponement of exams conducted during election period

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती :
संत गाडगे बाबा अमरावती वि‌द्यापीठ अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या नियमित विषम सत्राच्या हिवाळी २०२४ परीक्षा ह्या ११ नोव्हेंबर २०२४ ते २१ नोव्हेंबर २०२४ ह्या दरम्यान होणार आहेत आणि याच दरम्यान महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ पार पडणार आहेत, त्यामुळे त्या १० दिवसात निवडणुकांचा प्रचारांचा धुमाकूळ असणार आहे, प्रचार रॅली, प्रचार सभा भोंग्यांचा आवाज या सर्व घटना होणार आहेत आणि विद्यार्थी सुद्धा सर्व समजाचा, सिस्टिमचा, महाराष्ट्र राज्याचा भाग असल्याने निवडणुकीच्या महोत्सवात सहभागी होतील त्यामुळे साहजिकच या सर्व गोष्टींचा परिणाम हा वि‌द्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार आहे, या सर्व गोंधळात विद्यार्थी अभ्यास, उजळणी करू शकणार नाही परिणामी त्याचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वि‌द्यार्थ्याचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन आपण विद्यापीठ अंतर्गत घेण्यात येणाऱ्या नियमित विषम सत्राच्या हिवाळी २०२४ परीक्षा ह्या ११ नोव्हेंबर २०२४ ते २१ नोव्हेंबर २०२४ ऐवजी डिसेंबर २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात याव्या अशी मागणी केली. 


विधी अभ्यासक्रमात बदल झाल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाला वेळ हवा 
एलएलबी ३ इयर डिग्री कोर्स च्या दुसऱ्या सत्राचा निकाल २२/०८/२०२४ उशिरा लागल्याने, वि‌द्यार्थ्यांचे प्रवेश उशिरा झाले आणि त्यात अभ्यासक्रमात बदल झाल्याचे परिपत्रक जाहीर केले तोपर्यंत वि‌द्यार्थ्यांनी कोणता अभ्यास करायचा जुना की नवीन हे अधिकृत रित्या विद्यापीठाने जाहीर केलेले नव्हते, त्यामुळे त्या परिपत्रकापसून फक्त ४४ दिवसाचा कालावधी मिळतो त्यात ११ दिवस शासकीय सुट्या आहेत त्यामुळे फक्त ३३ दिवसाचा अतिशय कमी वेळ विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी मिळत आहे, वि‌द्यार्थ्याचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन आपण विद्यापीठ अंतर्गत घेण्यात येणाऱ्या नियमित विषम सत्राच्या हिवाळी २०२४ परीक्षा ह्या ११ नोव्हेंबर २०२४ ते २१ नोव्हेंबर २०२४ ऐवजी डिसेंबर २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात याव्या अशी नितिन साहेबराव जामनिक विद्यार्थी प्रतीनिधीने निवेदना‌द्वारे मागणी केली. 

Web Title: Students demand postponement of exams conducted during election period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.