सम्यक विद्यार्थी आंदोलनाची विद्यापीठावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 10:33 PM2019-02-08T22:33:59+5:302019-02-08T22:34:24+5:30
भारीप-बहुजन महासंघद्वारा प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाने शुक्रवारी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठावर धडक दिली. शासनाने लागू केलेले १३ पॉर्इंट रोस्टर बंद करून त्याऐवजी पूर्वीचे २०० पॉर्इंट रोस्टर सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली. राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या नावे मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भारीप-बहुजन महासंघद्वारा प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाने शुक्रवारी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठावर धडक दिली. शासनाने लागू केलेले १३ पॉर्इंट रोस्टर बंद करून त्याऐवजी पूर्वीचे २०० पॉर्इंट रोस्टर सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली. राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या नावे मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष महेश भारतीय यांच्या आदेशान्वये शुक्रवारी राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासंह विद्यापीठांवर मोर्चे काढण्यात आले. १३ पॉर्इंट रोस्टर प्रणालीमुळे ओबीसी, एससी, एसटी, एसबीसी आदी आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय करण्यात आल्याची बाब सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे अध्यक्ष अंकुश वाकपांजर यांनी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव हेमंत देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिली. या रोस्टरचा फटका सर्वाधिक शिक्षित वर्गाला बसणार आहे. यापूर्वीचे २०० पॉर्इंट रोस्टरमुळे ओबीसी, एससी, एसटी, एसबीसी प्रवर्गातील उमेदवारांना न्याय मिळायचा. मात्र, आता केवळ १३ पॉर्इंट रोस्टर लागू झाल्यामुळे आरक्षणाचा लाभ घेणाºया प्रतिनिधींना केवळ एक ते दोन टक्केच लाभ मिळेल. उर्वरित जागा या खुल्या संवर्गातील उमेदवार भरती केले जातील, असे निवेदनातून म्हटले आहे. २४ जानेवारी २०१९ रोजी १३ पॉर्इंट रोस्टर लागू करण्यात आले आहे. ही बाब शासकीय, प्रशासकीय कर्मचाºयांसाठी अन्यायकारक ठरणारी आहे. त्यामुळे २००६ पासून लागू करण्यात आलेले २०० पॉर्इंट रोस्टर नियमित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनाचे निवेदन प्रभारी कुलसचिव हेमंत देशमुख, डी.टी. इंगोले यांनी स्वीकारले. अंकुश वाकपांजर, प्रशिस कुºहाडे, प्रदीप चक्रनारायण, सुशील कोकणे, मुकेश ढोके, सुमित खंडारे, पंकज कांबळे, मिथून मोलके, सुमेध खंडारे, क्षीप्रा मस्के, किरण खंडारे, रेणुका खंडारे, कांचन अभ्यंकर, आरती खंडारे, रीना वानखडे, आम्रपाली हिवराळे आदी विद्यार्थी उपस्थित होते.