विद्यार्थ्यांनो, नव्या कल्पनांना आकार द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 01:42 AM2019-09-05T01:42:07+5:302019-09-05T01:43:06+5:30
आयुष्यात यशस्वी जीवनासाठी नव्या कल्पनांना आकार द्यायला युवापिढीने शिकले पाहिजे तेव्हाच तुम्ही स्वत:सह अनेकांना रोजगार देऊ शकाल, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आजच्या काळात महाविद्यालयीन विद्यार्थी कुठल्याही ध्येयाशिवाय शिक्षण घेत असतात. आयुष्याचे ध्येय निश्चित करण्यातच अनेकांच्या आयुष्यातील उमेदीचा काळ निघून जातो. त्यामुळे आयुष्यात यशस्वी जीवनासाठी नव्या कल्पनांना आकार द्यायला युवापिढीने शिकले पाहिजे तेव्हाच तुम्ही स्वत:सह अनेकांना रोजगार देऊ शकाल, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी येथे केले.
स्थानिक संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात जिल्हा नावीण्य परिषदेच्यावतीने तसेच विभागीय तंत्र शिक्षण सहसंचालक कार्यालय, संत गाडगे बाबा विद्यापीठाचे नवसंशोधन, नवोपक्रम आणि उन्नत भारत अभियानाच्या संयुक्त सहकार्याने आयोजित दोन दिवसीय 'स्टार्टअप बिझनेस प्लॅन कॉम्पीटिशन'चे उद्घाटन पार पडले. कार्यक्रमाला कुलगुरू मुरलीधर चांदेकर, दिनेश सूर्यवंशी, विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक डी.व्ही.जाधव, डी.टी. इंगोले, उच्च शिक्षण सहसंचालक संजय जगताप, कुलसचिव तुषार देशमुख, तंत्र शिक्षण सहायक संचालक एम.ए. अली, वर्षा भाकरे, विनोद कलंत्री, नरेंद्र येते, किरण पातुरकर, प्राचार्य आर.टी. मोगरे, अर्चना बारब्दे आदी उपस्थित होते.