युक्रेनच्या युद्धात अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायभूमीचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2022 05:00 AM2022-03-04T05:00:00+5:302022-03-04T05:00:53+5:30

युक्रेन येथे उच्च शिक्षणासाठी अमरावती जिल्ह्यातील ११ विद्यार्थी गेले आहेत. त्यांपैकी दोन विद्यार्थी घरी परतले असून, चार विद्यार्थी देशात दाखल झाले आहेत. मात्र, रशिया, युक्रेन यांच्यात युद्ध थांबण्याची चिन्हे दिसून येत नाहीत; त्यामुळे अडकलेल्या विद्यार्थ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. युद्धाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असलेल्या खारकीव्हमधून ऋषभ गजभिये निघाला आहे. त्याने रोमानियाची सीमा गाठली आहे.

Students stranded in the war in Ukraine | युक्रेनच्या युद्धात अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायभूमीचे वेध

युक्रेनच्या युद्धात अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायभूमीचे वेध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रशिया आणि युक्रेन या देशांत सुरू झालेल्या युद्धामुळे उच्च शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना जोरदार फटका बसला आहे; तर युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायभूमीचे वेध लागले आहे. गुरुवारी हिमवृष्टी आणि उणे १० डिग्री तापमान असतानासुद्धा अमरावतीचा ऋषभ गजभिये याने रोमानियाची सीमा गाठली, तर स्नेहा लांडगे ही दिल्ली येथे पोहोचल्याची माहिती आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार जिल्ह्यातील ११ पैकी ६ विद्यार्थी भारतात पोहोचले असून, ५ विद्यार्थी प्रवासात आहेत.
युक्रेन येथे उच्च शिक्षणासाठी अमरावती जिल्ह्यातील ११ विद्यार्थी गेले आहेत. त्यांपैकी दोन विद्यार्थी घरी परतले असून, चार विद्यार्थी देशात दाखल झाले आहेत. मात्र, रशिया, युक्रेन यांच्यात युद्ध थांबण्याची चिन्हे दिसून येत नाहीत; त्यामुळे अडकलेल्या विद्यार्थ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. युद्धाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असलेल्या खारकीव्हमधून ऋषभ गजभिये निघाला आहे. त्याने रोमानियाची सीमा गाठली आहे. गत तीन दिवसांपासून रोमानिया सीमेवर हिमवृष्टी होत असल्याने सीमा पार करताना जीव मुठीत घेऊन भारतीय व रोमानिया दूतावासांत पोहोचावे लागले. एकूणच भारतीय विद्यार्थ्यांना मायभूमीचे वेध लागले आहेत. गुरुवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास स्वराज गणेश पुंड निवासस्थानी पोहोचला. यावेळी नागरिकांनी त्याचे स्वागत केले.

थंडीचे तीन दिवस जीवन-मरणाचे
रोमानिया सीमेवर तीन दिवस हिमवृष्टीमुळे मरणयातना भोगाव्या लागल्या. दूतावासात चांगली वागणूक मिळाली नाही. थंडीमुळे प्रचंड वेदना सहन कराव्या लागत आहेत, अशा संतप्त भावना युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या आहेत. सीमा ओलांडताना जीव मुठीत घेऊन वृषभ बाहेर पडला, असे त्याचे वडील वैभव गजभिये यांनी सांगितले. सर्वच विद्यार्थी सुखरूप यावे, अशी मनीषा व्यक्त केली.

युक्रेनमध्ये उच्च शिक्षणासाठी ११ विद्यार्थी गेले आहेत. त्यांपैकी आतापर्यंत ६ विद्यार्थी भारतात दाखल झाले आहेत. पाच विद्यार्थी मायदेशी परतण्यासाठी मार्गस्थ आहेत.
- आशिष बिजवल, निवासी उपजिल्हाधिकारी, अमरावती.

ऋषभ याने अतिशय कठीण प्रसंगातून युक्रेनमधून रोमानियाची सीमा ओलांडली आहे. रेल्वे, टॅक्सी यांचा त्याला आधार घ्यावा लागला. अमरावतीत पोहोचण्यासाठी किमान दोन दिवस लागतील. गुरुवारी व्हिडिओ कॉलने त्याने संवाद साधला. विशेष विमान उपलब्ध झाल्यानंतरच भारतात येईल, असे तो म्हणाला.
- वैभव गजभिये, अमरावती (ऋषभचे वडील)

अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थी कुठे, कसे?
- प्रणव पुनसे हा अमरावतीत घरी पोहोचला.
- तुषार गंधे बुधवारी रात्री ७ वाजून ३० वाजता व्हिडीओ कॉलवरून हंगेरी बुडापेस्ट शहरात मुक्कामी. 
- तनिष सावंत बुधवारी रात्री ११ वाजून ३० वाजता हंगेरी येथील बुडापेस्ट शहरात मुक्काम. 
- ऋषभ गजभिये हा गुरुवारी सकाळी ११ वाजता रोमानिया सीमेपासून ४० किलोमीटर लांब आहे.
- स्वराज पुंड हा गुरुवारी सकाळी दिल्लीवरून विमानाने नागपूरकडे रवाना झाला. रात्री अमरावतीत घरी पोहोचला.
- प्रणव भारसाकडे बुधवारी रात्री ८ वाजून ३० वाजता हंगेरी येथील बुडापेस्ट शहरात मुक्कामी. 
- मोहम्मद रिजवान बुधवारी रात्री १० वाजता रोमानिया बॉर्डरवरून विमानतळाकडे रवाना झाला.
- कुणाल कावरे गुरुवारी सकाळी १० वाजून ३० वाजता दिल्ली येथे पोहोचला आहे.
- नेहा लांडगे हिने बुधवारी रात्री टेस्क मॅसेजनुसार ती गुरुवारी दिल्ली येथे पोहोचली.

 

Web Title: Students stranded in the war in Ukraine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.