विद्यार्थ्यांनो, ६२ रूपयांत घ्या पाच लाखांचा विमा, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे ‘विद्यार्थी जीवन
By गणेश वासनिक | Published: October 21, 2023 03:31 PM2023-10-21T15:31:10+5:302023-10-21T15:31:58+5:30
अपघात विमा योजना’ लागू, १६ ऑक्टोंबर रोजी शासनादेश जारी
अमरावती : राज्यातील अकृषी विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यार्थी वैयक्तिक अपघात विमा आणि वैद्यकीय विमा योजना लागू केली आहे. तसा शासन निणर्य १६ ऑक्टोबर २०२३ रोजी जारी करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना शासन त्यांच्या आरोग्यासह जीवाचीही काळजी घेणार आहे.
६२ रूपयांत पाच लाखांचा अपघात विमा
विद्यापीठ अथवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विमा योजना ही ‘एैच्छिक स्वरूपाची’ आहे. यात ६२ रूपयांमध्ये विद्यार्थ्यांना पाच लाख रूपयांचा अपघता विमा काढता येणार आहे. शासनाने ही जबाबदारी नॅशनल ईन्शुरनस्स कंपनीने जबाबदारी सोपविण्याचा निणर्य घेतला आहे.
२० रूपयात एक लाखांचा वैद्यकीय विमा
आज धकाधकीच्या काळात अपघाताचे प्रमाण वाढलीस लागले आहे. तसेच जवळपास सर्वच विद्यार्थ्यांकडे वाहने असतात. त्यामुळे शासनाने विद्यार्थी वैयक्तिक अपघात विमा योजनेतंर्गत २० रूपयांत एक लाखांचा वैद्यकीय विमा काढण्याचा निणरय घेतला आहे, आयसीआयसीआय लोंबार्ड ईन्शुरनस्स कंपनीने ही जबाबदारी दिली आहे.
कोणत्या विद्यार्थ्याना घेता येणार लाभ?
विद्यापीठ अथवा संलग्नित महाविद्यालयात पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेणारे विद्यार्थी वैयक्तिक अपघात विमा योजनेसाठी पात्र असतील. प्रथत ते अंतिम वर्षापर्यंतच्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी विमा योजनेसाठी लाभ घेऊ शकतात.
काय कागदपत्रे लागणार?
विद्यापीठ अथवा महाविद्यालयात प्रवेश, ओळखपत्र, प्राचार्यांचे अर्जावर स्वाक्षरीसह शिक्का, गुणपत्रिका, जन्मतारीख अथवा बोर्ड प्रमाणपत्र, फोटो.
कोणाशी संपर्क साधाल?
वैयक्तिक अपघात विमा आणि वैद्यकीय विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य अथवा कार्यालयीन अधीक्षक, विद्यापीठाचे महाविद्यालयीन विभाग प्रमुखांना भेटून या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थी हे ६२ रूपयांत पाच लाख, २० रूपयांत एक लाखांचा वैयक्तिक अपघात विमा तर ४२२ रूपयात दोन लाखांच्या वैद्यकीय विमा योजनेला लाभ घेऊ शकतील. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सर्वार्थाने प्रयत्न केले जाईल.
- नलिनी टेभेंकर, सह संचालक, उच्च शिक्षण अमरावती.