‘स्टंट राईडर’चा शहरात पुन्हा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:24 AM2017-12-12T00:24:32+5:302017-12-12T00:24:58+5:30

‘धूम स्टाइल’ने बाईक पळविणाºया स्टंटबाजांनी तीन दुचाकींना कट मारल्याने पाच जण जखमी झाले. स्टंट राईडरचा हा धुमाकूळ रविवारी अमरावती ते बडनेरा रोडवर पाहायला मिळाला.

'Stunt Rider' recovers in city | ‘स्टंट राईडर’चा शहरात पुन्हा धुमाकूळ

‘स्टंट राईडर’चा शहरात पुन्हा धुमाकूळ

Next
ठळक मुद्देतीन दुचाकींवरील पाच जण जखमी : अमरावती-बडनेरा रोडवरील घटना

आॅनलाईन लोकमत
अमरावती : ‘धूम स्टाइल’ने बाईक पळविणाºया स्टंटबाजांनी तीन दुचाकींना कट मारल्याने पाच जण जखमी झाले. स्टंट राईडरचा हा धुमाकूळ रविवारी अमरावती ते बडनेरा रोडवर पाहायला मिळाला. जखमींना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अद्यापपर्यंत या अपघाताविषयी तक्रार करण्यात आलेली नाही.
शहरातील बालाजीनगरातील रहिवासी भारत बघेल हे पत्नी कविता व पुतण्या गिरीराजला घेऊन दुचाकीने रविवारी बडनेरा रोडवरील एका शॉपिंग मॉलमध्ये जात होते. दरम्यान, दुपारी ३ वाजताच्या सुमारास सातुर्णाजवळ भरधाव दुचाकीस्वार स्टंट राइडिंग करीत धुमाकूळ घालत होता. त्यांच्या दुचाकीपर्यंत पोहोचताच स्टंट राइडर कट मारून भरधाव बडनेराच्या दिशेने निघून गेला. मात्र, बघेल यांचे दुचाकीवरील नियंत्रण गेल्याने त्यांची दुचाकी रस्त्याच्या मधोमध दुभाजकावर आदळली. या अपघातात भारत बघेल, कविता बघेल व गिरीराज जखमी झाला. काही नागरिकांनी बघेलसह त्यांच्या कुटुंबीयांची मदत करून तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. याच अपघाताप्रमाणे या स्टंटबाजांनी रस्त्यावरील आणखी दोन दुचाकीस्वारांना कावा मारून खाली पाडले. त्यांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा प्रकार रोखण्याची मागणी करण्यात आली आहे.

स्टंटबाजांचा दुसरा कारनामा
कल्याणनगरातील रहिवासी धनंजय महादेव माहुरकर हे रविवारी रात्री ११.३० वाजता त्यांच्या कार (एमएच २७ एटी-५१५२) ने गोपालनगरहून दस्तुरनगर मार्गाकडे जात होते. दरम्यान, एमआयडीसी रोडवर त्याच्या कारसमोर स्टंटबाजी करीत पाच ते सहा जणांनी दुचाकी उभ्या केल्या. त्यांना कारच्या बाहेर काढून शिवीगाळ करीत मारहाणसुद्धा केली. या घटनेची तक्रार राजापेठ पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. या स्टंट राइडरमध्ये एमएच २७ एव्ही-४२० या दुचाकी क्रमांकांचा समावेश असल्याचे माहुरकर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

Web Title: 'Stunt Rider' recovers in city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.