दर्यापुरात सुभाष पाळेकर यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By admin | Published: April 24, 2016 12:17 AM2016-04-24T00:17:08+5:302016-04-24T00:17:08+5:30

शहरात पद्मश्री सुभाष पाळेकर यांचे झीरो बजेट शेतीविषयी मोलाचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभणार आहे.

Subhash Palekar's guide to the farmers at the door | दर्यापुरात सुभाष पाळेकर यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

दर्यापुरात सुभाष पाळेकर यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Next

बाजार समितीचे सभागृह : 'झिरो बजेट नैसर्गिक शेती'वर कार्यशाळा
दर्यापूर : शहरात पद्मश्री सुभाष पाळेकर यांचे झीरो बजेट शेतीविषयी मोलाचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभणार आहे. लोकनेत्या माजी आमदार, कोकिळाबाई गावंडे (सांगळूदकर) यांच्या ३० व्या पुण्यतिथीनिमित्त जे.डी.पाटील सांगळूदकर स्मृती केंद्राच्यावतीने रविवार २४ एप्रिल रोजी सकाळी ८.३०ते सायंकाळी ५ वाजतादरम्यान दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात 'झीरो बजेट नैसर्गिक शेती' या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. पद्मश्री सुभाष पाळेकर यांची झीरो बजेट नैसर्गिक शेती एका देशी गाय पासून ३० एकर शेती या तंत्रावर आधारित खारपाणपट्टयातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमाचे शुभारंभ अकोटचे आ. प्रकाश भारसाकळे यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता होणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची कार्यशाळा राहणार असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे अवाहान या कार्यशाळेचे आयोजक, दर्यापूर बाजार समितीचे संचालक कुलदीप गावंडे, जे.डी. पाटील सांगळूदकर स्मृती केंद्रचे अध्यक्ष कुलभूषण गावंडे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Subhash Palekar's guide to the farmers at the door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.