स्थायीसह विषय समितीच्या बैठकी आता ऑफलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:12 AM2020-12-22T04:12:21+5:302020-12-22T04:12:21+5:30
अमरावती : महापालिकेतील स्थायी समिती व चार विषय समित्यांच्या बैठकी आता फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर करीत महापालिकेतील स्व. सुदामकाका देशमुख ...
अमरावती : महापालिकेतील स्थायी समिती व चार विषय समित्यांच्या बैठकी आता फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर करीत महापालिकेतील स्व. सुदामकाका देशमुख सभागृहात होणार आहेत. याविषयी सोमवारी नगरविकास विभागाच्या अवर सचिवांचे पत्र महापालिकेला प्राप्त झाले.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने सर्व नागरी स्थानिक संस्थांनी त्यांच्या विहीत बंधनकारक सभा, बैठकी पुढील आदेशापर्यंत नियमितपणे केवळ व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याच्या ३ जुलै २०२० च्या सूचना होत्या. त्यानुसार स्थायी समितीसह, शिक्षण समिती, महिला व बाल कल्याण समिती, विधी समिती तसेच नगर सुधार समितीच्या सभा आतापर्यंत घेण्यात येत आहेत. आता मात्र विहित कार्यपद्धतीचे पालन करुन प्रत्यक्ष सहभागाने घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर, हाताची स्वच्छता, सर्दी व खोकताना घ्यावयाची काळजी, बैठकीसाठी पुरेशी व्यवस्था, सॅनिटायझरचा वापर यानुसार आता बैठकी घेता येणार आहे.
कोरोनासंदभार्तील विहित कार्यपद्धतीची परिपूर्ण सुनिश्चित करण्याची जबाबदारी संबंधित पीठासीन अधिकारी व आयुक्तांवर राहणार असल्याचे पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले. मात्र, सर्वसाधारण सभेसाठी फिजिकल डिस्टन्सचा निकष पाळला जाणार नसल्याने आमसभा ही ऑफलाईनच राहणार आहे.