बसपाच्या तीन सदस्यांचे विषय समितीमधून राजीनामे

By admin | Published: June 7, 2014 12:34 AM2014-06-07T00:34:25+5:302014-06-07T00:34:25+5:30

महापालिकेत शनिवारी होऊ घातलेल्या विषय समित्यांच्या सभापती, उपसभापती निवडणुकांच्या

Subject committee of three members of the BSP resigns | बसपाच्या तीन सदस्यांचे विषय समितीमधून राजीनामे

बसपाच्या तीन सदस्यांचे विषय समितीमधून राजीनामे

Next

अमरावती : महापालिकेत शनिवारी होऊ घातलेल्या विषय समित्यांच्या सभापती, उपसभापती निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी बसपाच्या तीन  सदस्यांनी विषय समितीमधून सदस्यत्वाचे राजीनामे दिल्याने एकच खळबळ उडाली. दीपक पाटील, निर्मला बोरकर, अलका सरदार,  असे राजीनामे  देणार्‍या सदस्यांची नावे आहेत.
महापालिकेत चार विषय समित्या आहेत. नियोजित कार्यक्रमानुसार ७ जून रोजी या समित्यांचे सभापती व उपसभापतींची निवडणूक होत आहे. मात्र  बसपाचे गटनेता अजय गोंडाणे यांनी नियुक्त केलेले शिक्षण समिती सदस्य दीपक पाटील, विधी समिती सदस्य निर्मला बोरकर व महिला बाल कल्याण  समिती सदस्य अलका सरदार यांनी राजीनामे महापौर, आयुक्त, नगरसचिवांकडे पाठविले. राजीनामे देणार्‍या या सदस्यांना गटनेता म्हणून अजय  गोंडाणे हे मान्य नसल्यामुळेच राजीनामे दिल्याची चर्चा आहे.
कॉग्रेस व राष्ट्रवादी फ्रंटच्या वाट्याला प्रत्येकी दोन सभापती
शनिवारी होणार्‍या चार विषय समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी फ्रंटच्या वाट्याला अंतर्गत करारानुसार प्रत्येकी दोन  सभापतीपद येणार आहे. राष्ट्रवादी फ्रंटने सभापतीसाठी महिला बाल कल्याण सभापतीपदी निलीमा काळे तर शिक्षण समिती सभापतीसाठी हमीदा बानो  यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. काँग्रेसने शहर सुधार व विधी समिती सभापतीपदासाठी नावे निश्‍चित केली नसली तरी शहर सुधार सभापती  म्हणून कांचन ग्रेसपुंजे यांच्या नाव पुढे आले आहे.   (प्रतिनिधी)
 

Web Title: Subject committee of three members of the BSP resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.