गौण तस्करांची मुजोरी, तहसीलदारांना न जुमानता वाळू ट्रक पळवण्याचा घाट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 10:15 PM2024-02-06T22:15:02+5:302024-02-06T22:15:15+5:30

मनीष तसरे अमरावती : अवैध गौण खनिज पळवून नेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यांच्यावर आता कार्यवाहीचा फास आवळण्यासाठी अमरावती तहसील ...

Subordinate smugglers' Mujori, a ghat for running sand trucks in defiance of Tehsildars | गौण तस्करांची मुजोरी, तहसीलदारांना न जुमानता वाळू ट्रक पळवण्याचा घाट

गौण तस्करांची मुजोरी, तहसीलदारांना न जुमानता वाळू ट्रक पळवण्याचा घाट

मनीष तसरे
अमरावती :
अवैध गौण खनिज पळवून नेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यांच्यावर आता कार्यवाहीचा फास आवळण्यासाठी अमरावती तहसील कार्यालयाने तीन पथके निर्माण केली आहेत. सकाळी १०च्या सुमारास तहसीलदार विजय लोखंडे यांनी शहरातून एक वाळू वाहून नेणाऱ्या ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला असता ट्रकचालक न जुमानता वाहन पळविण्याचा प्रयत्न केला. पुढे श्याम चौकात त्याला पकडले. त्या वाहनाचा पंचनामा करून दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. कुठलीही रॉयल्टी नसताना वाळूची वाहतूक करण्याच्या कारणावरून चालक पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना ही कार्यवाही करण्यात आली.

बांधकामासाठी वापरण्यात येणारी वाळू, मुरूम, गिट्टी यांचे अवैध उत्खनन, वाहतूक रोखण्यासाठी, अवैध मार्गाने विनारॉयल्टी विक्री व साठवणूक आणि खरेदी करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे वाळू व गौण खनिजांची नियमानुसार जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या वाहतूक पावती द्वारे खरेदी करणे आवश्यक आहे.

त्यानुसार मंगळवारी सकाळपासून विद्यापीठ मार्गावर तहसील कार्यालयामार्फत गठित पथकाने अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांनी वाहतूक पास, रॉयल्टी तसेच परवान्याची तपासणी केली. यावेळी दोन वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये मंडळ अधिकारी डी.जी.गावनेर, वाय.एम.चतूर, एस.आर.जोगी, सरिता मोजरे, एम.डी.सांगळे, सोनल फुंदे, गिरमुंजे, अभिजित देशमुख, गजानन देशमुख, अजय पाटेकर, मनोज धर्माळे हे सहभागी होते.

 

Web Title: Subordinate smugglers' Mujori, a ghat for running sand trucks in defiance of Tehsildars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.