नारायणदास लढ्ढा हायस्कूलची दहावीच्या बोर्ड परीक्षेत यशस्वी झेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:10 AM2021-07-18T04:10:56+5:302021-07-18T04:10:56+5:30
अमरावती : ब्रिजलाल बियाणी शिक्षा समिती अंतर्गत असणाऱ्या नारायणदास लढ्ढा हायस्कूलने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दहावी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा ...
अमरावती : ब्रिजलाल बियाणी शिक्षा समिती अंतर्गत असणाऱ्या नारायणदास लढ्ढा हायस्कूलने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दहावी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम राखली. शाळेतून एस.एस.सी. परीक्षेत एकूण ११२ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी ४८ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत, ५८ब विद्यार्थी प्रथम श्रेणीत व ६ विद्यार्थी द्दितीय श्रेणीत उर्तीण झाले असून शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रगती गजानन शेटे हिने ९९.०० टक्के गुण प्राप्त करून शाळेत प्रथम येण्याचा मान पटकविला. निधी सुनील तायडे ९७.६० टक्के गुण प्राप्त करीत द्वितीय क्रमांक तसेच जान्हवी प्रमोद श्रीराव ९७.०० टक्के गुण प्राप्त करीत तृतीय क्रमांक व जयवंत विशाल शेंडे यांनी ९२.६० टक्के गुण मिळवीत पाचवा क्रमांक प्राप्त केला.
शालेय सत्र २०२०-२१ मधील प्रज्ञावंत विद्यार्थी व सर्व विद्यार्थ्यांकरिता घेण्यात येणारे अतिरिक्त पूरक मार्गदर्शन वर्ग व कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थांना ऑनलाईन पद्धतीच्या माध्यमांतर्गत विद्यार्थ्याशी जुळून त्यांची शैक्षणिक पात्रता उंचावण्यासाढी सर्व शिक्षकांनी अथक प्रयत्न केले. शालेय स्तरावर घेण्यात येणाऱ्या परीक्षांमुळे विद्यार्थी यशस्वी झाले.
ब्रिजलाल बियाणी शिक्षा समितीचे अध्यक्ष अशोक राढी व संस्थेचे तसेच शाळा समितीचे इतर सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन शाळेला नेहमीच लाभत असल्यामुळे शाळा नेत्रदीपक यश प्राप्त करू शकली. विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका लीला झंवर व पर्यवशिका ज्योती करवा, वर्ग शिक्षिका सुषमा माळवे व वर्षा वेदकर या शिक्षकांकडुन मार्गदर्शन लाभल्यामुळे विदयार्थी गूणवत्ता यादीमध्ये चमकले व आपला यशाचा तुरा कायम ठेवला.