जरूड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुधाकर मानकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:20 PM2019-02-25T23:20:49+5:302019-02-25T23:21:02+5:30
तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या जरूडच्या सरपंचपदी माजी सैनिक सुधाकर मानकर विजयी झाले. त्यांनी २,३१० मते घेऊन प्रतिस्पर्धी सोपान ढोले यांचा पराभव केला. जरूड ही १७ सदस्यीय ग्रामपंचायत आहे. सरपंचपद हे थेट जनतेतून निवडले गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जरूड : तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या जरूडच्या सरपंचपदी माजी सैनिक सुधाकर मानकर विजयी झाले. त्यांनी २,३१० मते घेऊन प्रतिस्पर्धी सोपान ढोले यांचा पराभव केला. जरूड ही १७ सदस्यीय ग्रामपंचायत आहे. सरपंचपद हे थेट जनतेतून निवडले गेले. येथील सरपंचपद अनुसुचित जातीकरिता राखीव असल्याने दिग्गज निवडणूक रिंगणात होते. मात्र सोमवारच्या मतमोजणीनंतर जरूडवासियांनी माजी सैनिक सुधाकर मानकर यांच्या खांद्यावर सरपंचपदाची जबाबदारी दिल्याचे स्पष्ट झाले.
जरूड या १७ सदस्यीय ग्रामपंचायतीमध्ये ६ प्रभागातून १७ सदस्य निवडून आले. सरपंच पदाकरिता एकूण ९ उमेदवार रिंगणात होते. प्रभाग क्रमांक १ मधून हर्षाली संजय धर्मे, सुजाता सुरेश हरले, प्रभाग २ मधून संगीता एकनाथ गोरले, योगेश नामदेवसिंह सोळंके, आशिष आंडे, प्रभाग ३ मधून प्रभाकर शामराव सयाम, संजय रामकृष्ण ढाले, प्रभाग ४ मधून सुशीला हरिश्चंद्र शेंडे, हर्षा रुपराव पडोळे, शैलेश वसंतराव ठाकरे, प्रभाग ५ मधून रेखा बंडूजी खडसे, प्रणाली नीलेश गुर्जर, प्रभाग ६ मधून शिल्पा भारत मसुले, जयश्री नितीन पोटे व अंकुश अशोक टोंगसे हे सदस्यपदी निवडून आलेत. दोन नामांकन अप्राप्त असल्याने केवळ १५ सदस्यपदांसाठी निवडणूक झाली. निवडणुकीचे निकाल घोषित होताच ग्रामस्थांनी जल्लोषात आतषबाजी केली.