सुधीर गावंडेंच्या आत्महत्येस पवार, बोंद्रे कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:44 AM2017-12-13T00:44:17+5:302017-12-13T00:44:43+5:30

महापालिकेचे पशू शल्यचिकित्सक सुधीर गावंडे यांच्या आत्महत्येस महापालिका आयुक्त हेमंत पवार आणि सहायक पशू शल्यचिकित्सक सचिन बोंद्रे कारणीभूत असल्याचा आरोप सुधीर गावंडे यांची पत्नी व वडिलांनी केला आहे.

Sudhir Gavenden's suicide busters cause bundre | सुधीर गावंडेंच्या आत्महत्येस पवार, बोंद्रे कारणीभूत

सुधीर गावंडेंच्या आत्महत्येस पवार, बोंद्रे कारणीभूत

Next
ठळक मुद्देपत्नी, वडिलांचा आरोप : राजापेठ ठाण्यात तक्रार दाखल, अधिकाºयांच्या हितसंबंधावर आक्षेप

आॅनलाईन लोकमत
अमरावती : महापालिकेचे पशू शल्यचिकित्सक सुधीर गावंडे यांच्या आत्महत्येस महापालिका आयुक्त हेमंत पवार आणि सहायक पशू शल्यचिकित्सक सचिन बोंद्रे कारणीभूत असल्याचा आरोप सुधीर गावंडे यांची पत्नी व वडिलांनी केला आहे. यासंदर्भात मंगळवारी दुपारी त्यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. ही आत्महत्या नसून, हत्या आहे आणि त्यासाठी आयुक्त व बोंद्रे यांनी प्रवृत्त केल्याचा आरोपही तक्रारीतून करण्यात आला आहे.
आयुक्त पवार व बोंद्रे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासोबत सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार सुधीर गावंडे यांच्या पत्नी डॉ. जया गावंडे आणि वडील साहेबराव गावंडे यांनी केली आहे. पवार आणि बोंद्रे यांच्या हितसंबंधावरही तक्रारीतून भाष्य करण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी सुधीर गावंडे यांनी त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येनंतर महापालिका वर्तुळात दु:खद पडसाद उमटले आणि शंका-कुशंका उपस्थित करण्यात आल्या. त्या पार्श्वभूमीवर जया गावंडे व साहेबराव गावंडे यांनी मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास राजापेठ पोलीस ठाणे गाठले. आत्महत्याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतल्याने चौकशी सुरू आहे. त्यामुळे दुसरी तक्रार स्वीकारली जाणार नाही, असे राजापेठ पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानंतर शिवसेनेचे सुधीर सूर्यवंशी यांच्या मध्यस्थीनंतर राजापेठचे ठाणेदार किशोर सूर्यवंशी यांनी तक्रार वजा अर्ज देण्याची परवानगी दिली. श्वान निर्बीजीकरण शस्त्रक्रिया घोटाळ्यात पतीच्या आत्महत्येचे मूळ दडले असल्याचा आरोप जया गावंडे यांनी केला आहे.
पवार-बोंद्रेंचे हितसंबंध?
पती सुधीर गावंडे यांना वेगवेगळ्या कारणांवरून त्रास देण्यात येत होता. त्यात आयुक्त हेमंत पवार आणि सहायक पशू शल्यचिकित्सक सचिन बोंदे्र यांचा सहभाग असल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. गावंडे यांना रजेवर पाठविल्यानंतर त्याचा कार्यभार बोंद्रे यांच्याकडे हस्तातंरित करण्यात आला. यातून बोंद्रे यांचे हितसंबंध जोपासले जात असल्याचा आरोप जया गावंडे यांनी केला आहे.
ड्रीम प्रोजेक्टपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न
आयुक्त पवार व बोंद्रे यांनी छत्री तलावाचे सौंदर्यीकरण प्रकल्पापासून गावंडे यांना हेतुपुरस्सर दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांचे निलंबन काळातील वेतन, भत्ते वारंवार पाठपुराव्यानंतरही देण्यात आले नाही. त्याकरिता त्यांना वेगवेगळ्या कारणांवरून त्रास देण्यात येत होता. असा आरोपा डॉ. जया व त्यांचे सासरे साहेबराव गावंडे यांनी केला.
आत्महत्येपूर्वी पत्नीशी संवाद
आयुक्तांनी बजावल्याप्रमाणे सुधीर गावंडे यांची १२ डिसेंबरला यवतमाळ मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय तपासणी होणार होती. त्या अनुषंगाने त्यांनी ११ डिसेंबरला दुपारी ३.३० च्या सुमारास आपल्याशी चर्चा केली. त्यावेळी आपण आयुक्त व डॉ. बोंदे्र यांच्या प्रचंड दडपणाखाली आहोत, काय करावे हे सुचत नाही, असे सांगून ते खालच्या बेडरूममध्ये शिरले आणि त्यांनी आतून दार लावून घेतले. सायंकाळच्या सुमारास लाइट लावण्यासाठी बाहेर आले असता, त्यांच्या आत्महत्येचा प्रकार उघड झाल्याचे जया गावंडे यांनी म्हटले.
सावळी येथे अंत्यसंस्कार
सुधीर गावंडे यांच्या पार्थिवाची दुपारी २ च्या सुमारास उत्तरीय तपासणी करण्यात आली. दुपारी ३ वाजताच्या सुमारास त्यांचे पार्थिव त्यांच्या अचलपूर तालुक्यातील सावळी (गावंडे) या मूळ गावी नेण्यात आले. तेथे दुपारी ५ च्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या दोन्ही उपायुक्तांसह सर्व सहायक आयुक्त, स्वच्छता अधिकारी, महापालिकेतील अन्य अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

या आत्महत्या प्रकरणाशी महापालिका कार्यालयातील संबंधित प्रशासकीय दस्तऐवजांची खातरजमा करण्यात येईल. संपूर्ण चौकशीनंतर कारवाईची दिशा निश्चित केली जाईल.
- दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त.

सुधीर गावंडे माझे सिनिअर, जवळचे मित्र होते. एकमेकांच्या सुख-दु:खात आम्ही सहभागी व्हायचो. गावंडे कुटुंबाने केलेले आरोप चुकीचे आहेत.
- सचिन बोंद्रे,
सहायक पशू शल्यचिकित्सक, महापालिका.

माझ्यावरील आरोप सर्वथा चुकीचे आहेत. या प्रकरणाशी माझा तीळमात्र संबंध नाही. मीच त्यांची पुनर्स्थापना केली. मागील चार महिन्यांत त्यांच्यावर कुठलीही प्रशासकीय कारवाई करण्यात आलेली नव्हती. उलट मी त्यांना वारंवार मदतच केली.
- हेमंतकुमार पवार, आयुक्त, महापालिका.

Web Title: Sudhir Gavenden's suicide busters cause bundre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.