सर्दी, तापाने अंजनसिंगी ग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:11 AM2021-04-25T04:11:46+5:302021-04-25T04:11:46+5:30
स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात नुकतेच कोरोना चाचणी शिबिर घेण्यात आले. त्याला गावातील नागरिकांचा व जीवनावश्यक वस्तूची व्यवसाय करणाऱ्या ...
स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात नुकतेच कोरोना चाचणी शिबिर घेण्यात आले. त्याला गावातील नागरिकांचा व जीवनावश्यक वस्तूची व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचा अल्पसा प्रतिसाद होता. सात हजार लोकवस्तीच्या गावामध्ये केवळ सहा नागरिकांनी कोरोना चाचणी करून घेतली. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन चाचणीसाठी नागरिकांना प्रेरित करण्यात अपयशी ठरले. अधिकारी आणि पदाधिकारी ग्रामस्वच्छता फवारणी तसेच कोरोना लसीसाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे आदीपासून कोसोदूर आहेत. आतादेखील येथील व्यावसायिक व्यवसाय नियमितपणे चालू ठेवतात. पोलीस दाखल होताच तेवढ्यापुरती दुकाने बंद केली जातात आणि ते परतल्यावर ती ‘जैसे थे’ सुरू ठेवली जातात. तालुक्यातील प्रशासनाने आणि ग्रामीण प्रशासनाने याकडे लक्ष घालून तसेच गावातील स्वच्छता करून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती करावी, अशी मागणी होत आहे.