फुलपाखरांना मराठीतून नावं देण्याची मोहीम; जैवविविधता मंडळाचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 06:30 PM2019-04-21T18:30:09+5:302019-04-21T18:48:32+5:30
फुलपाखरू हे जैवविविधतेमधील महत्त्वाचे घटक आहे. निसर्ग अभ्यासक आणि सामान्यांसाठी तो नेहमीच आकर्षणाचा विषय असतो. जीवसृष्टीमधील आकर्षक असे कीटक म्हणजे फुलपाखरू.
अमरावती : फुलपाखरू हे जैवविविधतेमधील महत्त्वाचे घटक आहे. निसर्ग अभ्यासक आणि सामान्यांसाठी तो नेहमीच आकर्षणाचा विषय असतो. जीवसृष्टीमधील आकर्षक असे कीटक म्हणजे फुलपाखरू. मात्र, या फुलपाखरांची बहुतांश नावे इंग्रजीतील आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने फुलपाखरांना मराठीतून नावे देण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे निसर्गप्रेमी, जैवविविधता अभ्यासक, तज्ञ्ज, नागरिकांकडून फुलपाखरांच्या मराठी नावांवर सूचना मागविल्या आहेत.
देशात फुलपाखरांची जैवविविधता संपन्न अशी आहे. जगाच्या तुलनेत दोन टक्के भूभागावर ११ टक्क्यांपेक्षा अधिक प्रजाती भारतात आढळतात. या प्रजाती १५०० वर आहेत. यापैकी २८५ प्रजातीचे फुलपाखरू महाराष्ट्रात आढळतात. त्यांना ओळखण्यासाठी लॅटीन भोषत शास्त्रीय नावे किंवा इंग्रजीत सामान्य नावे आहेत. देशात फुलपाखरांचा अभ्यास ब्रिटिशांच्या काळात झाला. त्यामुळे फुलपाखरांना त्यावेळी ब्रिटीश अधिकाऱ्यांनी नावे दिली आहेत.
सामान्यत: नावे ही त्यांचे रंग, रूप, आकार, अंगावरील ठिपके, सवय, वागणूक, त्यांचा सहवास किंवा शोधकर्त्यावरून नावे देण्यात आली आहे. परंतु, महाराष्ट्रातील फुलपाखरांना मराठीतून नावे असावीत. ती सोपी आणि लक्षात ठेवता यावी, सर्वसामान्यांना ओळखता यावी, यासाठी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने फुलपाखरांना नावे ठरविण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. यासमितीने राज्यात आढळणाºया फुलपाखरांना नावे ठरविण्यासाठी अटी, नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार अभ्यासक, निसर्गप्रेमी आदींना विविध माध्यमांच्याद्वारे पाठवून त्यावर सर्वांची मते, सूचना जाणून घेण्यात येणार आहे. २८५ प्रजातींच्या फुलपाखरांना मराठीतून नावे देण्यात येणार आहे.
या निकषावर असेल फुलपाखरांचे मराठीकरण
फुलपाखरांचे दिसणे, सवयी, शास्त्रीय नाव, खाद्य वनस्पती, इंग्रजी नावांचे भाषांतर, नावे सोपी व सुटसुटीत असावी, सामान्य माणसाला मराठी नावे कळावीत, असे निकष ठरविले आहे. महाराष्ट्र जैवविविधता मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन सूचना सादर कराव्या लागणार आहे. ११ मे २०१९ पर्यंत सूचना पाठवायच्या आहेत, अशी माहिती जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष विलास बर्डेकर यांनी दिली आहे.