अमरावती जिल्ह्यातील ममदापूर येथे शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 03:29 PM2018-01-11T15:29:43+5:302018-01-11T15:30:19+5:30
बोंड अळीने केलेल्या कपाशीच्या नुकसानामुळे हवालदिल झालेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. तिवसा तालुक्यातील ममदापूर येथे ही घटना १० जानेवारी रोजी उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बोंड अळीने केलेल्या कपाशीच्या नुकसानामुळे हवालदिल झालेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. तिवसा तालुक्यातील ममदापूर येथे ही घटना १० जानेवारी रोजी उघडकीस आली.
अशोक श्यामराव कडू (४८, रा. ममदापूर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते दोन दिवसांपासून घरून निघून गेले होते. यादरम्यान त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. यावेळी ते त्यांच्या काटसूर शिवारातील शेतात मृतवस्थेत आढळून आले. त्यांनी विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. त्यांच्यावर सेंट्रल बँकेचे कर्ज होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा आप्तपरिवार आहे. तिवसा पोलिसांनी गुरुवार, ११ जानेवारी रोजी सकाळी घटनेचा पंचनामा केला तसेच त्यांचा मृतदेह तिवसा ग्रामीण रुग्णालयातून शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांना सोपविण्यात आला. त्यांच्यावर दुपारी ममदापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.