अमरावतीत अल्पवयीन प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या, महादेवखोरी जंगलातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 09:46 PM2021-05-20T21:46:43+5:302021-05-20T21:47:09+5:30

अल्पवयीन प्रेमीयुगुलाची एकाच झाडाच्या फांदीला वेगवेगळ्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास फ्रेजरपुरा ठाणे हद्दीतील महादेवखोरी परिसरातील जंगलात उघडकीस आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली.

Suicide by minor couple in Amravati incident in Mahadevkhori forest | अमरावतीत अल्पवयीन प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या, महादेवखोरी जंगलातील घटना

अमरावतीत अल्पवयीन प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या, महादेवखोरी जंगलातील घटना

googlenewsNext

अमरावती : अल्पवयीन प्रेमीयुगुलाची एकाच झाडाच्या फांदीला वेगवेगळ्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास फ्रेजरपुरा ठाणे हद्दीतील महादेवखोरी परिसरातील जंगलात उघडकीस आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली.

पोलीससुत्रानुसार, मृतांमध्ये १६, वर्षीय मुलगी, तर १७ वर्षीय मुलाचा समावेश आहे. मुलगी ही फ्रेजरपुरा ठाणे हद्दीतून, तर मुलगा राजापेठ ठाणे हद्दीतून मिसिंग झाल्याची तक्रार मृताच्या नातेवाईकांनी १४ मे रोजी नोंदविल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. प्रेमीयुगुलांनी गळफास चार ते पाच दिवसांपूर्वी घेतला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला असून, सदर आत्महत्या प्रेमप्रकरणातून झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. दोघांचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत एकाच झाडाच्या फांदीला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम, पोलीस निरीक्षक नितीन मगर, पीएसआय गजानन सोनोने व पोलीस पथक तसेच महापालिकेचे रेसक्यू पथक घटनास्थळी दाखल झाले. मुलगा व मुलीच्या पालकांनाही घटनास्थळी नेऊन मृताची ओळख पटविण्यात आली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले व शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवागारात पाठविण्यात आले. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

Web Title: Suicide by minor couple in Amravati incident in Mahadevkhori forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.