कोरोना काळातही वाढल्या आत्महत्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:13 AM2021-05-09T04:13:49+5:302021-05-09T04:13:49+5:30
अमरावती : सततचे लॉकडाऊन, बेरोजगारी, कौटुंबिक वाद, प्रेम प्रकरणे, शेतीचा वाद तसेच इतर अनेक कारणांनी नैराश्य आल्याने गळफास घेऊन, ...
अमरावती : सततचे लॉकडाऊन, बेरोजगारी, कौटुंबिक वाद, प्रेम प्रकरणे, शेतीचा वाद तसेच इतर अनेक कारणांनी नैराश्य आल्याने गळफास घेऊन, विष प्राशन करून तसेच रेल्वेखाली उडी तसेच इतर प्रकारे २०२० या वर्षात शहर हद्दीतील १९९ जणांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सध्य कोरोना काळातही अनेक तरुणांनी आपले जीवन संपविले. २०१९ या वर्षाच्या तुलनेत १४ आत्महत्या अधिक झाल्या असून शहर पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत आत्महत्या वाढल्याची नोेंद आहे. २०१९ मध्ये १८५ जणांनी आत्महत्या केल्या. मात्र, कोरोना काळात अनेकांचा रोजगार हिरावल्यानंतरही आम्ही कोरोनाला घाबरणार नाही. आम्ही आत्महत्या करणार नाही, अशा आत्मविश्वासाने तरुणांनी व्यवसाय सुरू केला. मात्र शहरात कोरोना वाढत असल्याने मार्च, एप्रिल व आता मे महिन्यात टप्याटप्याने लॉकडाऊन लागल्याने पुन्हा तरुणांचे रोजगार बुडाला. त्यामुळे खचून जाऊन आत्महत्येचे प्रमाण वाढीस लागले आहे.
अशी आहे आत्महत्येची आकडेवारी
सन २०१९-१८५
२०२०-१९९
बॉक्स
चार प्रकरणांत गुन्हा नोंदविला
आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून २०२० या वर्षात शहर पोलिसांनी चार प्रकरणांत गुन्हा नोंदविला. २०१९ या वर्षात पाच प्रकरणांत पोलिसांनी गुन्हा नोंदविला. गत पाच महिन्यांची आकडेवारी उपलब्ध होऊ शकले नाही.
बॉक्स:
चोऱ्या घटल्या
२०२० मध्ये करण्यात आलेल्या चार ते पाच महिने लॉकडाऊनमुळे व नागरिक घरीच असल्याने गतवर्षी चोरीच्या प्रमाणात घट झाली आहे. २०२० या वर्षात ८४४ ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या. सन २०१९ मध्ये ८७३ चोरीच्या घटना शहरात घडल्या होत्या.
बॉक्स
८० महिलांवर अत्याचार
सन २०२० या वर्षात ८० महिलांवर अत्याचाराच्या घटना घडल्या. सन २०१९ मध्येही ८० महिलांवर बलात्कार झाल्याची नोंद पोलिसांकडे होती. सर्व प्रकरणांत गुन्हा नोंदवून तपास करण्यात आला. विनयभंगाच्या घटनाही वाढल्या आहेत.