सराफा गल्लीतील पे्रम प्रकरणातून सट्ट्याचा सुगावा

By Admin | Published: May 19, 2017 12:30 AM2017-05-19T00:30:57+5:302017-05-19T00:30:57+5:30

येथील सावकारपुरा भागातील १२ मे रोजी उघडकीस आलेल्या क्रिकेट सट्ट्याची जिल्ह्यात जोरदार चर्चा असली तरी

The suit in the bullfighting case of bullion lane is heard | सराफा गल्लीतील पे्रम प्रकरणातून सट्ट्याचा सुगावा

सराफा गल्लीतील पे्रम प्रकरणातून सट्ट्याचा सुगावा

googlenewsNext

प्रेमाची किंमत आठ लक्ष : पोलीस अधिकाऱ्याच्या रजेचा फायदा
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : येथील सावकारपुरा भागातील १२ मे रोजी उघडकीस आलेल्या क्रिकेट सट्ट्याची जिल्ह्यात जोरदार चर्चा असली तरी हा प्रकार अनेक दिवसांपासून कायद्याच्याच आशीर्वादाने सुरू होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सट्ट्याचा अड्डा उघडकीस आणण्याच्या प्रकरणामागे "दिलजले" प्रकारात मोडणारी पे्रमकथा आहे. सराफा गल्लीतील एका व्यापाऱ्याच्या मुलाचे तीन वर्षांपासून पानअटाई भागातील एका मुलीशी प्रेमसूत जुळले होते. दरम्यान, मुलीच्या कुटुंबीयाने तिचे लग्न इतरत्र ठरविले; पण सराफा व्यापाऱ्याच्या मुलाने दूरध्वनीवरून वरपक्षाला या प्रकरणाची माहिती देऊन लग्न फिस्कटवले. ज्या क्रमांकावरून फोन केला गेला, ते सिमकार्ड तपासांती सराफा व्यापाऱ्याच्या "त्या" मुलाचे असल्याचे सिद्ध झाले होते.
या प्रकरणानंतर मुलीने स्वत: पोलीस ठाणे गाठले; पण तक्रार नोंदविण्याऐवजी प्रकरण मागे घेण्यासाठी तिची समजूत घालण्यात आली. प्रकरण मिटविण्यासाठी पोलिसातील विशिष्ट अधिकाऱ्याने मोठी रक्कम घेतल्याची खमंग चर्चा त्यावेळी गावात रंगली होती. ती आता पुन्हा उफाळून आली आहे. प्रकरण दाखल न करण्याचे पाच लक्ष आणि शांत राहण्यासाठी मुलीच्या कुटुंबीयांना तीन लक्ष, अशी आठ लक्ष रुपये त्या व्यापाऱ्याला प्रेमाची किंमत मोजावी लागल्याचा हिशेब अंजनगावातील गप्पांच्या फडांचा विषय ठरला आहे.
ज्या व्यापाऱ्यावर हा प्रसंग गुदरला त्या व्यापाऱ्याचे सट्टा चालविणाऱ्या एका इसमाशी विळाभोपळ्याचे वैर होते. त्या इसमाने या प्रकरणाची शक्य तितकी चर्चा गावभर घडवून आणली. व्यापाऱ्याला किती पैसे मोजावे लागलेत आणि पोलिसातील अधिकाऱ्याने किती रक्कम घेतली, या हिशेबाचा त्याने सर्वत्र प्रचार केला.
सदर व्यापाऱ्याला हा मुद्दा जसा झोंबला तसाच तो "त्या" पोलीस अधिकाऱ्यालाही अस्वस्थ करून गेला. आपली बदनामी करणारा इसम स्वत: सट्टा व्यवसायात असल्यामुळे त्याला धडा शिकविण्याचे ठरवले गेले आणि क्रिकेट सट्टा पकडला गेला. दरम्यान, ज्या दिवशी सट्टा अड्ड्यावर धाड घालण्यात आली, त्याच दिवशी एक वरिष्ठ पोलीस अधिकारी बदलीचे आदेश मिळाल्यानंतर रजेवर गेले होते. नेमकी ती संधी साधून सट्टा अड्यावर कारवाई करण्यात आली होती.
"लोकमत"ने अंजनगावात बेमालूमपणे तळ ठोकून माहिती मिळविली असता, या प्रकरणाची खोली गहिरी असल्याचे समोर आले. प्रकरण व्यापक आणि धक्कादायक असले तरी पोलीस हात राखून कारवाई करीत आहेत. या प्रकरणातील गुपिते आणि दबाव याविषयीची नवनवीन माहिती समोर येत आहे.

Web Title: The suit in the bullfighting case of bullion lane is heard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.