सुकळी कम्पोस्ट डेपोत फेकल्या कालबाह्य औषधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 11:06 PM2018-11-28T23:06:45+5:302018-11-28T23:07:27+5:30
मानवी शरीरासाठी घातक असणाऱ्या कालबाह्य आयुर्वेदिक व अॅलोपॅथिक औषधांचा साठा सुकळी वनारसी येथील कम्पोस्ट डेपोत फेकण्यात आल्या. हे निदर्शनास येताच बुधवारी खळबळ उडाली.
अमरावती : मानवी शरीरासाठी घातक असणाऱ्या कालबाह्य आयुर्वेदिक व अॅलोपॅथिक औषधांचा साठा सुकळी वनारसी येथील कम्पोस्ट डेपोत फेकण्यात आल्या. हे निदर्शनास येताच बुधवारी खळबळ उडाली. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कम्पोस्ट डेपोत आढळलेल्या त्या कालबाह्य औषधांचे नमुने ताब्यात घेतले असून, पुढील चौकशी सुरू केली आहे.
कम्पोस्ट डेपोत औषधांचा साठा फेकण्यात आल्याची माहिती तेथील एका शेतकऱ्याने अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्या माहितीच्या आधारे औषध सुरक्षा अधिकारी उमेश घरोटे यांनी बुधवारी कम्पोस्ट डेपोत पाहणी करून तेथील काही औषधांचे नमुने ताब्यात घेतले. ते औषधांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. याशिवाय बॅच क्रमांकाच्या आधारे हा औषधसाठा कोणत्या विक्रेत्याकडील आहे, याचा शोध एफडीए घेणार आहे. एफडीएने नोंदविलेल्या निरीक्षणात हा औषधसाठा आठ ते दहा वर्षे जुन्या असल्याचे आढळून आल्या आहेत. वैद्यकीय कचरा नष्ट करण्यासाठी प्रशासनाने बेलोरा येथे सुविधा करून ठेवली आहे. तो सुकळी डेपोत टाकण्याचा प्रकार नियमाबाह्य असल्याचे मत एफडीएचे आहे. हा वैद्यकीय कचरा येथे जाळण्यात आल्यास त्यामधून निघणारे रासायनिक द्रव्य हवेवाटे मानवी शरीरावर घातक परिणाम करण्याची शक्यता अधिक आहे.