सारांश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:12 AM2021-02-08T04:12:39+5:302021-02-08T04:12:39+5:30
भातकुली : नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प अंतर्गत गौरखेडा गावात शेती दिन साजरा करण्यात आला. शेती शाळा समन्वयक पुरुषोत्तम कडू ...
भातकुली : नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प अंतर्गत गौरखेडा गावात शेती दिन साजरा करण्यात आला. शेती शाळा समन्वयक पुरुषोत्तम कडू व हरीश फरकांडे यांनी कापूस, सोयाबीन, तूर या पिकांबद्दल मार्गदर्शन केले. निंबोळी अर्क, डीएपी या घटकांची माहिती कार्यशाळेत देण्यात आली. यावेळी प्रशिक्षक कल्पना मनवर, वैष्णवी बहाडे, मनीषा बनसोड, प्रीती जवंजाळ, सागर डेरे उपस्थित होते.
---------
धामणगाव-देवगाव रस्त्याची दुरवस्था
धामणगाव रेल्वे : तीन जिल्ह्यांचा केंद्रबिंदू असलेल्या धामणगाव शहरात यवतमाळ-देवगावहून येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. धामणगाव-देवगाव रस्त्याची दुरवस्था त्यासाठी कारणीभूत ठरली आहे. त्यामुळे अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
---------
संत्रा उत्पादकांच्या आशेवर फेरले पाणी
मोर्शी : यंदा आंबिया बहराचे उत्पादन चांगले होण्याची आशा संत्राउत्पादकांना होती. मात्र, शेतकरी भीषण दुष्काळ, टोळधाड, संत्रा गळती, संत्रा झाडाची पानगळ, कोरोना या सर्व संकटांमुळे हवालदिल झाला असून, नैसर्गिक संकटांमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले. वरूड तालुक्यातही तीच परिस्थिती आहे.