सारांश बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:12 AM2021-05-11T04:12:40+5:302021-05-11T04:12:40+5:30
चिखलदरा : तालुक्यातील बागलिंगा येथून एका मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आले. ३ मे रोजी दुपारी ही घटना घडली. ...
चिखलदरा : तालुक्यातील बागलिंगा येथून एका मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आले. ३ मे रोजी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी चिखलदरा पोलिसांनी ८ मे रोजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
--------
रघुनाथपुरातून दुचाकी लांबविली
तिवसा : तालुक्यातील रघुनाथपूर येथील सुदर्शन चरपे यांच्या मालकीची एमएच २७ एएस ८२४४ या क्रमांकाची दुचाकी चारचाकी वाहनाद्वारे लंपास करण्यात आली. ६ मे रोजी सकाळी ९ च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी तिवसा पोलिसांनी आरोपी सागर बायस्कर, वैभव जवने व समीर डहाके (तिघेही रा. रघुनाथपूर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
--------------
खरवाडी येथे किराणा दुकान फोडले
चांदूरबाजार : तालुक्यातील खरवाडी येथील निखिल लांबट (२५) यांच्या किराणा दुकानाचे शटरचे कुलूप तोडून गल्ल्यातील ७०० ते ८०० रुपये चोरीला गेले. सोबतच गावातील आशिष कडू, नंदू अंबाडकर, सुभाष निंभोरकर, मनोहर बंड यांच्या घराचे, दुकानाचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न झाला. ७ मे रोजी रात्री या घटना घडल्या. चांदूरबाजार पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.
---------------
बेलोरा येथून दुचाकी लांबविली
चांदूरबाजार : तालुक्यातील बेलोरा येथून रावसाहेब मलवार यांच्या मालकीची एमएच २७ एएक्स २६९३ क्रमांकाची दुचाकी चोरीला गेली. ७ मे रोजी ही घटना घडली. याप्रकरणी चांदूरबाजार पोलिसांनी मलवार यांच्या तक्रारीवरून ८ मे रोजी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.
----
रेल्वे स्टेशन क्वार्टरमधून रोख लांबविली
चांदूरबाजार : येथील रेल्वे स्टेशन क्वार्टरमधून ५ हजार रुपये रोख लांबविण्यात आली. ७ मे रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी भिंतीलाल उईके यांच्या तक्रारीवरून चांदूरबाजार पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.
--------------
खरवाडी मार्गावर रेतीची अवैध वाहतूक
चांदूरबाजार : तालुक्यातील खरवाडी ते आखतवाडा रोडवरील नाकाबंदीदरम्यान रेतीची अवैध वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली, मोबाईल, दुचाकी व रेती असा एकूण ५ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेने ८ मे रोजी दुपारी ही कारवाई केली. याप्रकरणी भैया धाकडे (रा. कुरळपुर्णा), शैलेश अर्डक (रा. शिरजगाव अर्डक) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
-------------
वाठोडा शुक्लेश्वर येथे तरुणाला मारहाण
भातकुली : तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे राहुल प्रकाश केकतकर (२८) याला विटेने मारहाण करण्यात आली. ८ मे रोजी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी खोलापूर पोलिसांनी आरोपी स्वप्निल महादेव रावेकर (२६, वाठोडा) विरिद्ध गुन्हा दाखल केला.
--------
झांझनपुऱ्यातून ५० हजारांचा घोडा पळविला
अंजनगाव सुर्जी : येथील झांझनपुरा भागातून नौशाद शेख अल्लाउद्दीन (३५) यांच्या मालकीचा ५० हजार रुपये किमतीचा घोडा लंपास करण्यात आला. ७ ते ८ मे दरम्यान ही घटना घडली. अंजनगाव सुर्जी पोलिसांनी संशयित आरोपी सोफीयान बेग नासिर बेग, शेख साकिब शेख सादिक (दोन्ही रा. नवगज्जी प्लॉट) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
-----------
नळाचे पाणी भरण्यावरून मारहाण
मोर्शी : नळावर पाणी भरण्याच्या वादातून विजयसिंग बैस (६०) यांना मारहाण करण्यात आली. तथा शिवीगाळ करण्यात आली. ७ मे रोजी सकाळी ७ च्या सुमारास नेरपिंगळाई येथे ही घटना घडली. शिरखेड पोलिसांनी याप्रकरणी आरोपी दादू भालेराव व रवि भालेराव (दोन्ही रा. नेरपिंगळाई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
-------------
वाडेगाव शिवारात बाप-लेकांना मारहाण
वरूड : तालुक्यातील वाडेगाव शिवारात रामेश्वर बोपची (६५) व त्यांचा मुलगा विलास याला काठीने मारहाण करण्यात आली. ८ मे रोजी रात्री ही घटना घडली. वरूड पोलिसांनी याप्रकरणी गजानन नामदेव बोपची, नामदेव बोपची, किसना बोपची (सर्व रा. वाडेगाव) यांत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
-------------
कोविड लस न मिळाल्याने अनेकांचा हिरमोड
मोर्शी : कोरोना प्रतिबंधक लसीकरणसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रचंड गर्दी होत असून सामाजिक अंतर पाळले जात नसल्याचे दिसून आले. परिणामी फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला आहे. लस उपलब्ध होत नसल्यामुळे अनेकांचा हिरमोड होत आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाविरुद्ध प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
---------
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानात टेंभुरखेड्याचा समावेश
वरूड : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान प्रकल्पांतर्गत टेंभुरखेडा येथील युवा सेंद्रीय शेतकरी बचत गटाची निवड करण्यात आली आहे. गटाच्या सर्व सभासदांच्या निर्णयानुसार वाहन खरेदी केले आहे. त्या वाहनातून शेतकरी ते थेट ग्राहक असा भाजीपाला व फळे विक्री केली जात आहे. त्या वाहनाचे लोकार्पण तालुका कृषी अधिकारी संतोष सातदिवे, के.एल.काणे, कृषी सहायक पी.एस. सातव उपस्थित होते.
-----------
वीज देयक भरायचे कसे?
येवदा : गतवर्षी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी घोषित केलेले अनुदान अद्यापही मिळालेले नसल्याची वस्तुस्थिती आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पाठवलेले अवाजवी कृषी व घरगुती वीज देयके भरायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सुरुवातीला शासनातर्फे वीजबिल माफ करण्याबाबत चर्चा होती. आता वाढलेले वीजबिल भरणे शक्य नाही.
---------------
कुसूमकोट-भोकरबर्डी रस्त्याची चाळण
धारणी : मध्यप्रदेशात जाणाऱ्या अमरावती बुरहाणपूर मुख्य मार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. याबाबत जिल्हा परिषद सदस्य तथा माजी महिला व बालकल्याण सभापती वनिता पाल यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे या रस्त्याबाबत तक्रार केली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक वेळा गंभीर प्रकारचे अपघात होऊन लोकांना जखमी व्हावे लागल्याचे वास्तव आहे.
----------
पुलाचे बांधकाम अर्धवट स्थितीत
मोर्शी : शहरातून गेलेल्या नांदगाव पेठ ते वरूड सिमेंट रस्त्याचे बांधकाम जवळपास दीड वर्षाआधी पूर्णत्वास गेले. मात्र, मोर्शी येथील नळा नदीवरील पुलाचे बांधकाम अर्धवट स्थितीत पडले आहे. पुढे जाणारा रस्ता हा समोर गेलेल्या रस्त्याला जोडला गेला नाही. त्याच ठिकाणाहून डावीकडे श्रीक्षेत्र पाळा, सालबर्डी मार्गाकडे वाहने मार्गक्रमण करीत असताना या ठिकाणी अनेक अपघात घडले आहेत.
---------