सारांश बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:11 AM2021-05-17T04:11:18+5:302021-05-17T04:11:18+5:30
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील वाघोली येथील अमोल चव्हाण (४०) यांच्या नव्या घरातील आलमारीतून १ लाख ७० हजार रुपयांचा सोन्याचे ...
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील वाघोली येथील अमोल चव्हाण (४०) यांच्या नव्या घरातील आलमारीतून १ लाख ७० हजार रुपयांचा सोन्याचे ऐवजासह रोख रक्कम लंपास करण्यात आली. १३ मे रोजी रात्री ११ च्या पुढे ही घटना घडली. त्यात ३६ ग्रॅम वजनाच्या सोन्याचे दोन पोत, १५ ग्रॅमचा गोफ, दोन अंगठ्या, कर्णफुले असे एकूण ९१ ग्रॅम सोने व २० हजार रुपयांचा समावेश आहे. याप्रकरणी दत्तापूर पोलिसांनी १४ मे रोजी अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंदविला. चव्हाण हे कुटुंबियासमवेत जुन्या घरात झोपले असताना हा प्रकार घडला.
-------------
जुन्या वैमनस्यातून वृध्दाला मारहाण
अंजनसिंगी : जुन्या वैमनस्यातून महादेवराव बुल्ले यांना लोखंडी पाईपने मारहाण करण्यात आली. १३ मे रोजी आजणगाव येथे हा प्रकार घडला. मंगरुळ दस्तगीर पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेच्या तक्रारीवरून आरोपी नितीन साखे व लक्षमण साखे (दोन्ही रा. आजणगाव) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याचप्रकरणी नितीन साखे यांच्या तक्रारीवरून महादेव बुल्लेविरूद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला.
-----------
पतीसोबत वादावादीत महिलेचा विनयभंग
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील एका ३८ वर्षीय महिलेचा विनयभंग करण्यात आला. जीवाने मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ करण्यात आली. १४ मे रोजी सकाळी घडलेल्या या घटनेप्रकरणी लोणी पोलिसांनी आरोपी रोशन मोखळे (३०, रा. हिवरा बु.) विरुद्ध गुन्हा दाखल केला.
-------------
मांडू येथे महिलेला मारहाण
धारणी : तालुक्यातील मांडू येथे एका २४ वर्षीय महिलेला मारहाण करण्यात आली. १४ मे रोजी क्षुल्लक कारणावरून हा वाद झाला. याप्रकरणी धारणी पोलिसांनी रूपचंद मेटकर व दोन महिलांविरुद्ध भादंविचे कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.
-------------
लासूर येथे महिलेला मारहाण
दर्यापूर : तालुक्यातील लासूर येथील एका महिलेला कु-हाडीच्या दांड्याने मारहाण करण्यात आली. १३ मे रोजी दुपारी घरगुती कारणावरून हा वाद झाला. पोलिसांनी एका ६५ वर्षीय इसमाविरूद्ध भादंविचे कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला.
-----------
सूर्यखेडा शिवारातून ताडपत्री लंपास
शेंदूरजनाघाट : वरूड तालुक्यातील सूर्यखेडा शिवारातून १५ हजार रुपये किमतीची ताडपत्री लंपास करण्यात आली. ११ मे रोजी ही घटना घडली. याप्रकरणी शेतमालक रमेश गोरडे (रा. धनोडी) यांच्या तक्रारीवरून शेंदूरजनाघाट पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.
-------------
किराणा दुकानातून खाद्यतेल लांबविले
वरूड : स्थानिक पांढुर्णा चौकातील आ. ए. किराणा दुकान फोडून ४,४६० रुपये किमतीचे खाद्यतेल लंपास करण्यात आले. १३ ते १४ मे दरम्यान ही घटना घडली. मालक अनिल खंडेलवाल हे १४ मे रोजी पहाटे फेरफटका मारण्यास गेले असता दुकानाच्या शटरचे कुलूप तुटलेले दिसले. वरूड पोलिसांनी संशयित म्हणून आशिष बासुंदे (मिरची प्लॉट, वरूड) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
--------------
वेल्डिंग वर्कशॉपमध्ये चोरी
मोर्शी : येथील पेट्रोलपंपाच्या बाजूने असलेले धीरज प्रधान यांचे वेल्डिंग वर्कशॉप फोडण्यात आले. तेथून केबल, वायर, हॅन्ड कटर, पानबुडी मोटर असा ६२ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला. १४ मे रोजी ही घटना घडली. याप्रकरणी प्रधान यांच्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.
------------
चिंचोली गवळी येथे तरुणाला मारहाण
मोर्शी : तालुक्यातील चिंचोली गवळी येथील शंकर हटकर (३५) याला काठीने मारहाण करण्यात आली. कोंबडी कापण्याच्या कारणावरून हा वाद झाला. १४ मे रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी मोर्शी पोलिसांनी आरोपी राजा हटकर (४२, चिंचोली गवळी) विरूद्ध गुन्हा दाखल केला.
-----------
गोंडवाघोली येथे इसमाला मारहाण
पथ्रोट : अचलपूर तालुक्यातील गोंडवाघोली येथे गंगाराम बेलकर (४८) यांना शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. १४ मे रोजी शेतीच्या हिस्सेवाटणीवरून हा वाद झाला. पथ्रोट पोलिसांनी याप्रकरणी बादल बेलकर, अनुराग गाठे व अन्य एकाविरूद्ध गुन्हा दाखल केला.
---------------
माधान शिवारात दोघांना मारहाण
चांदूरबाजार : तालुक्यातील माधान येथील दिलीप मोहोड यांच्या शेतात गोकुल वानखडे व नंदकिशोर पाटील यांना मारहाण करण्यात आली, बकऱ्या चारल्याने शेतात नुकसान झाल्याचा आरोप करून १४ मे रोजी ही घटना घडली. चांदूरबाजार पोलिसांनी आरोपी सुरेंद्र नाईक, अक्षय अवसरमोल, आशिष अवसरमोलविरूद्ध गुन्हा दाखल केला.
--------------
कोदरी हरक येथून मोटार लांबविली
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील कंझरा येथील अनिल दांढे यांच्या कोदरी हरक शिवारातून १२ हजार रुपये किमतीची पाणबुडी मशिन लंपास करण्यात आली. नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.
---------------
फोटो पी १६ पोटे
महापालिकेला रॅपिड अॅन्टिजेन किट
अमरावती : पी.आर.पाटील ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स अमरावतीकडून स्व.सूर्यकांतादेवी रामचंद्र पोटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महापालिकेला दोन लाख रुपये किमतीचे रॅपिड अॅन्टिजन टेस्ट किट भेट देण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष आ. प्रवीण पोटे यांनी सदर किट महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांना सुपुर्द केली. यावेळी ह्रदयरोगतज्ज्ञ प्रफुल्ल कडू, डॉ. संगीता कडू, वैद्यकीय अधिकारी विशाल काळे, जयश्री नांदुरकर उपस्थित होते.
------------
ईव्हीएमचे प्रतिकात्मक दहन
शिंदी बु : भारतीय बेरोजगार विद्यार्थी मोर्चाच्यावतीने ईव्हीएमची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. सावळी दातुरा येथे हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला बुद्धिस्ट इंटरनँशनल नेटवर्कचे तालुका अध्यक्ष संतोष कौतीक्कर यांनी जाहीर समर्थन दिले.
--------------
पोलीस कर्मचाऱ्याच्या निधनानंतर मित्रांकडून ८७ हजारांची मदत
कु-हा : खोलापूर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस नाईक मंगेश गुगलमाने (रा. अमरावती) यांचे १७ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांच्या मित्रांनी ८७ हजार रुपये जमा करत गुगलमाने यांचे मुलीचे नावे ठेव ठेवण्याचे निश्चित केले. मंगेश गुगलमाने यांची ८ वर्षीय मुलगी माधुरी गुगलमाने हिच्या नावे मुदत ठेवीच्या स्वरूपात ठेवली आहे.
-----------
फोटो पी १६ सारस्वत
राधेश्याम सारस्वत
चांदूरबाजार : राधेशाम रामकिसन सारस्वत (६५, रा. वणी बेलखेडा) यांचे नुकतेच निधन झाले. ते संन्याशी होते. स्थानिक मंदिरात पूजाअर्चा करत होते.
-----------
फोटो पी १६ बाबुराव देशमुख
बाबुराव देशमुख
चांदूरबाजार : बाबूराव गोपाळराव देशमुख (५८, रा. वणी बेलखेडा) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते सेवा सहकारी सोसायटीचे संचालक होते. त्यांच्या पश्चात मूलगा व मुलगी असा आप्तपरिवार आहे.